प्रिय युवा मित्रांनो,
देशात सध्या सर्वात जास्त चर्चिलेले विषय
निवडणूक व मोदी-राहुल-केजरीवाल हे आहेत. तुम्ही सर्वच त्याबाबत आपली मते सजगपणे व
विचारपूर्वक बनवून खचितच मतदान कराल.
दुर्दैवाने तीन व्यक्तींवर केंद्रित झालेल्या
या उधाणात या तिघांची खरी परीक्षा त्यांचे विचार, देशासाठी नीती व कार्यक्रम या
वरून व्हायला पाहिजे याकडे दुर्लक्ष होत आहे.
देशासमोरील काही महत्वाचे प्रश्न व त्यावर
काही वाचनीय असे या पार्सलमध्ये पाठवतो आहे.
१. विकास
कोणत्या मार्गाने? यावर अमर्त्य सेन व जगदीश भगवती या दोन विश्वविख्यात
अर्थशास्त्रज्ञांमध्ये घमासान वैचारिक वादंग सुरु आहे. त्याचा सोपा परिचय.
२. भारतातील
स्त्रीची सुरक्षा व बलात्काराची आकडेवारी – लॅन्सेट मधील पत्र.
३. सचिन
तेंडूलकर निवृत्त होवून सहा महिने झालेत. भावनिक उधाण शांत झाले. भारताला सचिन का
एवढा महत्वाचा झाला? यावर ‘इकॉनॉमिस्ट’ चे भाष्य
४. ‘लोकशाही’
ही राज्यपद्धती जागतिक उतरणीवर आहे का? लोकशाहीच्या मर्यादा काय? ‘इकॉनॉमिस्ट’
मधील वैश्विक आढावा.
५. शहरांचे
कचरा व्यवस्थापन : शहरांची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ३१ टक्के आहे.
पुढील २५ वर्षात ती जवळपास ५० टक्के होणार आहे. शहरे ही जणु कचरा निर्मितीचे
प्रचंड कारखाने झाले आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी? Down
to Earth मधील दोन शहरांची गोष्ट.
६. माणुसकीचा
ऱ्हास? कोनार्ड लोरेंझ या जगप्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञाच्या पुस्तकाचा नंदाकाकानी
तुम्हाला करून दिलेला अतिसंक्षिप्त परिचय. हे निव्वळ एपेटायझर !
तुमचा,
नायना
प्रश्न: तुम्ही यातील काय काय वाचले? कसे वाटले? त्यावर तुमचे
विचार व अजून वाचन काय? पाठवा (simollanghan@gmail.com )
पुढील अंकापासून ते सदर प्रकाशित करू. – चॉकलेट कट्टा !
No comments:
Post a Comment