नमस्कार मित्रांनो,
कसे आहात? मजेत ना? आज मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ही
गोष्ट कदाचित तुम्ही सगळ्यांनीच ऐकली किंवा पाहिलीही असेल. पण मला खात्री आहे की या
गोष्टीचा पुढचा भाग, sequel च म्हणाना, बऱ्याच जणांना माहिती नाहीए.
गोष्ट लखनौ पासून सुरू होते. एक तरूण IIT कानपूर हून यांत्रिकी अभियांत्रिकीचं (Mechanical Engineering) पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतो, नंतर अमेरिकेत जाऊन Florida विद्यापीठात Ph.D.पुर्ण करतो. पुढे २ वर्ष तिथेच प्राध्यापकाची नोकरीही करतो.
पण मायदेशाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. १९८२ साली तो तडक अमेरिका सोडून महाराष्ट्रातील
फलटणसारख्या खेड्यात (तेव्हाच्या) येऊन कायमचा स्थायिक होतो व खेड्यातील गरीब जनांसाठी तंत्रञानविकासाच्या माध्यमातून
झपाट्याने कामाला लागतो.
काय? आशितोष गोवारीकरचा ‘स्वदेस’ आठवला ना? पण या कथेचा नायक शाहरुख नसून डॉ. अनिल राजवंशी
हे आहेत आणि ते फलटणमध्ये (चरणपूरला नव्हे!) ‘नारी’ (Nimbkar Agricultural Research
Institute) नावाने एक NGO चालवतात. ‘नारी’ चं काम शेती व animal husbandry मध्ये खुप नावाजलेलं आहे पण मी आज फक्त renewable energy (अपारंपारिक ऊर्जा) आणि sustainable development (शाश्वत विकास) याबद्दलच बोलणार आहे. ‘स्वदेस’च्या शेवटी शाहरुख चरणपूरला परत येतो आणि चित्रपट तिथेच संपतो, पण चरणपूरला परत आल्यावर शाहरुख काय-काय
करतो, हे कुठे तुम्हाला माहितीए? हा भाग मी तुम्हाला सांगतो!
१९८२ सालापासून ते आजतायागत ‘नारी’ ने विविध ऊर्जा समस्यांना हात घातलाय. सौरऊर्जेवर चालणारं ethanol distillation plant, ज्वारीपासून (sweet sorghum) इथेनॉल निर्मिती,
solar detoxification, solar
disinfection technique of water
अशा अनेक गोष्टींवर ‘नारी’ मध्ये संशोधन झालंय आणि त्यांची उत्तर शोध निबंधांतून प्रसिद्धही केली गेली आहेत.
खेड्यातील ऊर्जा स्वावलंबनाच्या कल्पनांचं ‘TALUKA ENERGY SELF-SUFFICIENCY PLAN’ सारख्या national policyमध्ये रुपांतरही झालं आहे. ‘नारी’च्या Motor Assisted Pedal Rickshaw (MAPRA) दिल्ली, लखनौसारख्या शहरात धावतआहेत. खास अपंगांकरिता ‘नारी’ने MANHARA नावाची motor
assisted tricycleही बनवली होती.
डॉ. राजवंशींनी ‘Biomass Gasification’चं तंत्रञान भारतात आणलं आणि ऊसाची वाळलेली
पाने (चिपाड) वापरून यशस्वी प्रयोगही केले. यातं तंत्रज्ञानाचं महत्त्व सांगताना डॉ. राजवंशी म्हणतात, "भारतासमोर एवढं मोठं energy crisis असतानासुद्धा कोणीही biomass gasification मध्ये संशोधन करण्यात रस दाखवला नाही, हे भारताचं मोठं दुर्दैव आहे."
अंधारलेल्या झोपड्यांना प्रकाशमय करणाऱ्या ‘Noorie
Lantern’ने भरपुर प्रकाश
पसरविला. नंतर‘नारी’ने महाग व दुर्मिळ होत चाललेल्या केरोसीनवर मात करण्यासाठी इथेनॉलवर चालणारे cook stoves बनविले. आज, Lantern आणि Stove
यांना संयुक्तपणे
बांधून Lanstove नावाचा masterpiece ‘नारी’नं बनवलाय, जो लोकांपर्यंत पोहोचण्यास सज्ज आहे. आपल्यापैकी ’सामाजिक उद्योजगता’
करू इच्छिणार्यांहसाठी
हा एक चांगला product आहे, असे मला वाटते (असो,
वाटू दे!) अशा प्रकारे‘नारी’मध्ये पाणी, घरगुती ऊर्जा, दळणवळण, अंधार निर्मुलन, इ. प्रश्नांवर संशोधनाच्या माध्यमातून शाश्वत उत्तर शोधण्याचा छोटासा प्रयत्न आणि
खेड्यातील जीवनशैली अद्ययावत बनवण्याचा मार्ग ‘शोध’ चालू आहे.
‘नारी’ सोबतचा माझा प्रवास १ डिसेंबर२०१४ ला चालू झाला. आज मी तिथे एक trainee engineer म्हणून काम करतोय. या थोड्याच दिवसांत माझं (निर्माणच्याच भाषेत
सांगायच झालं तर) खूप ‘learning’ झालं. इंजिनियरिंग च्या ४ वर्षात जी ’माती खाल्ली’, तीत काहीशी सुधारणा होताना दिसतेय. आता हेच घ्याना, इंजिनियरिंग च्या बऱ्याचश्या concepts ज्या फक्त वाचल्या होत्या, त्या इथे मी ‘fundamentally’
शिकतोय, समजतोय आणि वापरतोय.
डॉ. राजवंशींसोबत काम करताना वेळोवेळी MK आणि KM चा वापर
करावा लागतो, कारण spoon feeding इथे चालत नाही. खेड्यातलं जीवन, इथल्या सवयी, त्यांच्या ‘धारणा’, रिती-रिवाज, शिक्षणाची स्थिती, आर्थिक स्थिती, इथलं आध्यात्म, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, सोयी, समस्या हे सगळं कोण्या पुस्तकातून नव्हे तर उघड्या डोळ्यांनी
पाहतोय, अनुभवतोय! कारण त्यांच्याचसाठी चालू असलेल्या ह्या तंत्रञान विकासाच्या कामात ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणूनच
कुठल्याही समस्येवर काम करताना त्याचं solution हे दीर्घकाळ आणि शाश्वत कसं राहील, ह्या ‘Begin with the End’ च्या strategy ने विचार
करून शोधायची सवय आपोआपच लागतेय! ‘ढोबळमानाने’ सांगायचं झालं तर, मित्रांनो, इंजिनियरिंगच शिकतोय, पण नव्याने!!!
No comments:
Post a Comment