'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 28 February 2015

प्रिय मित्र-मैत्रिणींनो,

निर्माणच्या सहाव्या बॅचच्या १२४ वैद्यकीय आणि अवैद्यकीय मित्र-मैत्रिणी अधिकृतपणे आपल्या कुटुंबात दाखल झाल्या आहेत. दरवेळे प्रमाणे ‘तारूण्यभान ते समाजभान’ ही या शिबिरांची theme होती. या शिबिरांबद्दल थोडक्यात...वैद्यकीय शिबिराच्या काही दिवस आधी नायनांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तातडीने नागपूरला हलवावे लागले. मात्र शिबीर ठरलेल्या वेळीच पार पडले पाहिजे असा अम्मा व नायना दोघांचाही आग्रह होता. या शिबिरात दोघांचीही उपस्थिती अतिशय मर्यादित राहिली. दोघांच्या अनुपस्थितीत शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. योगेश कालकोंडे यांची खूप मदत झाली. या शिबिरात अनेक सहभागी पद्धतीची सत्रे झाली. खेळ (उदा. जीतो जितना जित सको), Group exercises (माया केस स्टडी, Who is the best doctor, धानोरा तालुक्याला विविध मार्गांनी ३ वर्षे आरोग्यसेवा देण्यासाठीच्या नियोजनाचे सादरीकरण), Book club (१० जणांनी १० पुस्तकांबद्दल सर्वांसमोर सादरीकरण केले), Journal club (६ गटांनी ६ scientific / semi-scientific articles बद्दल सर्वांसमोर सादरीकरण केले), वादविवाद, विनोबांच्या लेखांचे वाचन आणि गटचर्चा, रोज होणारे डायरीचे शेअरिंग यांमार्फत शिबिरार्थ्यांनी शिबीर समृद्ध केले. शिबिराच्या शेवटच्या टप्प्यात अम्मा व नायनांनी शिबिरार्थ्यांसोबत गप्पा मारल्या. नायनांची तब्येत हळूहळू सुधारत आहे.
दोन्ही शिबिरांत learning blog चा प्रयोग झाला. शिबिरातले महत्त्वाचे learnings काही शब्दांच्या माध्यमातून लक्षात रहावे यादृष्टीने फळ्याचा learning blog म्हणून उपयोग करण्यात आला. दोन्ही शिबिरात प्रेरणा व वैचारिक स्पष्टता यासोबतच काही कौशल्ये देण्याच्या उद्देशाने सत्रे झाली. सुनील काकांनी 7 habits पैकी पहिल्या दोन habits वर सत्र घेतले. संतोष भाऊ आणि महेश भाउंनी ‘मोजावे का व कसे’ हे सत्र घेतले, तर योगेश दादाने ‘वैद्यकीय कुशलतेची धार कशी वाढवावी’ हे सत्र घेतले. श्रद्धा चोरगी, मंदार देशपांडे, प्रफुल्ल शशिकांत, केदार आडकर आणि निखिल जोशी या जुन्या निर्माणींनी या शिबिरांत शेअरिंग केले. दोन्ही शिबिरांदरम्यान रक्तदान शिबीर घेण्यात आले.
*****
निर्माणचा application form भरताना आपण बरेचदा लिहितो की, ‘मला समाजासाठी काही तरी करायचय, पण काय ते समजत नाही.शिक्षण क्षेत्रात काम करू की पर्यावरणाच्या क्षेत्रात, की शेतीच्या क्षेत्रात करू? माझी आवड आणि कौशल्ये नेमकी कशात आहेत? हे कायआपल्याला कसं समजू शके? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.
कर के देखोया तत्त्वानुसार प्रत्यक्ष काम करून योग्य निवड करण्यास मदत व्हावी यासाठी निर्माण तर्फे कर के देखोफेलोशिप सुरूकरण्यात येत आहे. यानुसार ३ फेलोजना एका वर्षासाठी १०,००० रू प्रती महिना फेलोशिप देण्यात येईल. निर्माणच्या सर्व ‘गुगल ग्रुप्स वर फेलोशिपचा तपशील पाठवला आहे. तरी ज्या निर्माणींना या फेलोशिपची गरज असेल त्यांनी आपले नाव व resume १० मार्च पर्यंत contact.nirman@gmail.com  वर पाठवावा.
*****
याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी एप्रिल २०१५ पासून होण्याची शक्यता आहे. त्यासाठी चंद्रपूरच्या महिलांच्या आंदोलनाला निर्माणच्या अनेक युवांनी सक्रीय पाठींबा दिला होता. चंद्रपूरची दारूबंदी झाल्यावर गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा असा दारूबंद झोन तयार होईल. २७ जानेवारी रोजी, पिताजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, ‘तिन्ही जिल्ह्यांत परिणामकारक दारूबंदी कशी करता येईल?’ या प्रश्नावर विचारमंथन करण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांतील सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांची परिषद माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शोधग्राममध्ये संपन्न झाली.

*****

No comments:

Post a Comment