'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 11 August 2013

पुस्तक परिचय

मनोगती- डॉ. आनंद नाडकर्णी

‘मनोगती’ हे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे एक उत्कृष्ठ पुस्तक ! माझं मराठीतील दुसरंच पुस्तक असल्याने भाषा थोडीसी कठीण वाटली, पण असे नाही की तुम्हालाही जड जाईल.
डॉ. नाडकर्णी आणि ठाणे येथील Institute for Psychological Health (IPH) हे connection आपल्या सर्वांना माहीतच आहे. या माहितीमध्ये त्यांच्या अनुभवांची भर पडावी असे हे पुस्तक. या पुस्तकात डॉ. नाडकर्णी आपल्या पेशंट्स सोबत आलेले अनुभव मांडतात. त्याचसोबत मानसशास्त्रातील काही महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाश टाकतात. या पुस्तकात डॉ. अल्बर्ट एलिस ह्या मानसशास्त्रज्ञाची Rational Emotive Behavior Therapy (REBT) ही मानसोपचार पद्धती आणि आपली संत परंपरा, तसेच गीता यांचा सुंदर संगम मांडून पेशंटच्या समस्या कशा सोडवल्या हे सांगितले आहे. एखाद्या पेशंटला जर असा डॉक्टर मिळाला की जो औषधोपचाराबरोबरच देवावर विश्वास दाखवत अभंग, संतवाङ्मय,गीतेतील श्लोक इ. द्वारा आपल्या आजारावर मात करण्याचा मार्ग दाखवतो, तर त्याहून अधिक सहजता उपचारांत निर्माण करणे शक्य आहे असं मला वाटत नाही. ज्ञानेश्वरीतील कृष्ण ते अभंगांतील तुकाराम हे सगळे आपल्याच व्यक्तिमत्वाला अधिक सुंदर बनवण्याकरता, माणूस म्हणून जगण्याच्या या प्रवासाला सजवण्याकरता नेहमीच आपल्या पुराणात होते, पण हे आपल्याला कधी समजलेच नाही. हा बदल हे पुस्तक घडवून आणते.
या पुस्तकात डॉ. नाडकर्णी सोप्यापासून सुरुवात करत आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक सकारात्मक कसं करता येईल व आपला दृष्टीकोन कसा बदलता येईल याबद्दल आपल्याला सांगतात. आजच्या rat race मध्ये तणाव सर्वांनाच येतो. या तणावाला कसे हाताळायचे हे अगदी पद्धतशीरपणे समजावून सांगतात. त्यांच्या पुस्तकातील हे वाक्य self explanatory आहे: Nothing is either good or bad, thinking makes it so. त्यांची A (activating event) à B (belief) à C(consequences) ही कल्पना खूप खास आहे. Activating belief consequences event. आपण नेहमी C वर, म्हणजेच  result वर लक्ष केंद्रित करत असतो. पण C पर्यंत पोहोचण्यासाठी जी process (B) आहे, तिचा विचार करत नाही. मग आपल्याला हवा असणारा C (result) कसा मिळेल?
Unconditional Self Acceptance (USA) बद्दल सांगताना ते म्हणतात की आपल्याला गुण व दोषांचा सारखाच स्वीकार करायला हवा. ते गुण-दोष म्हणजेच मी नसून ते माझा भाग आहेत. हे केले तर आत्मस्वीकाराची (USA) वृत्ती वाढते. तेव्हाच आपण अहंपणातून बाहेर पडू. Factors Beyond Control आणि Factors Within Controlह्याचे भान जेव्हा आपल्याला येते, तेव्हा आपण ABC या ट्रॅकवर येतो आणि B चे महत्त्व जाणतो.
लेबल लावणे आणि लेबल स्वीकारणे हे दोन्ही माणूस म्हणून आपल्या प्रगतीच्या मध्ये येते. म्हणूनच लेबल न लावता वेळीच आपल्या चुका स्वीकारणे महत्त्वाचे.
USA चा पुढचा टप्पा म्हणजे UOA (Unconditional Others’ Acceptance) आणि UWA (Unconditional World Acceptance) हे त्यांनी खूपच सुंदरपणे एकनाथांच्या काही ओळींद्वारे मांडले आहे. आपल्या विचार करण्यात, वागण्यात, दृष्टीकोनात बदल घडवून आणल्याने कसे हे जगदेखील बदलते हे त्यांनी सांगितले आहे.
डॉ. एलिस यांच्या विचार, भावना, वर्तन या Triad व भारतीय परंपरेतील ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग आणि कर्ममार्ग यांच्यात समानता आहे हे पुस्तक वाचताना लक्षात येते.
Self talk चे आपल्या आयुष्यातले महत्त्व व त्याचा परिणाम आपल्या वाणीत, वागण्यात कसा उद्भवतो हे समजावताना ते सांगतात की आपल्याच सोबत सुसंवाद करणे किती महत्त्वाचे व गरजेचे आहे.
Addiction सारख्या समाजातील मोठ्या समस्येला आपण वैयक्तिक स्तरावर कसे तोंड देऊ शकतो याबद्दल बोलताना living and longing आणि craving यातील फरक ते समजावतात.
पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात IPH मध्ये वापरण्यात येणाऱ्या group therapies मध्ये मंत्र, जप यांचा समावेश कसा व का असतो हे ते सांगतात. आपल्या विचारांचे भान कसे आणायचे व त्याकरिता विलय (Integration) आणि विलग (Dissociation) यांचे महत्त्व ते सांगतात.
शेवटी मृत्यूसारख्या भयावह परंतु कटू सत्य असणाऱ्या वस्तुस्थितीला अधिक चांगल्या रितीने आयुष्यात स्वीकारून मृत्यूच्या भयापासून कसे दूर जाता येईल याचे शिक्षण ते देतात.
पुस्तक वाचताना बरेचदा असे झाले की भाषा क्लिष्ट वाटली, कधीकधी एखादी संकल्पना समजली नाही. पण त्याचबरोबर अनुभव आला की आपणही तणावग्रस्त होतो, घाबरतो, रागाच्या आहारी जाऊन चुकीचे वर्तन करतो. हे पुस्तक सर्वांनाच काहीतरी देईल. निव्वळ फरक हाच की कोण किती घेण्याच्या तयारीने वाचतोय.
(हा पुस्तक परिचय वाचून जर कोणी हे पुस्तक वाचले आणि त्यांना पुस्तकाबद्दल चर्चा करायची असेल तर मला नक्की आवडेल. कारण खूप गोष्टी मलाही अजूनपर्यंत समजल्या नाहीत.)

पल्लवी बापट, trendsetters.palloo@gmail.com

तिनका तिनका जर्रा जर्रा

दोन मैत्रिणी असतात, कमल आणि चंदा म्हणूया. दोघीही एका चाळीत राहणाऱ्या. दोघींचेही नवरे एका कारखान्यात काम करणारे. कमलचे कपडे नेहेमीच साधे, तर चंदा दर काही दिवसांनी नव्या ड्रेसमध्ये दिसणारी. एकदा कमल चंदाला याचं रहस्य विचारते-- चाळीत इतक्या सटासट नवे कपडे आश्चर्याचेच.
चंदा सांगते, "दर काही दिवसांनी नवरा घरी परतल्यावर मी त्याच्यामागे कटकट करते, "मी आपलं दिवसभर स्वयंपाकपाणी आणि धुणीभांडी करायची, आणि तू मात्र घरी येऊन गरम चहाची ऑर्डर सोडायचीस. का सहन करायचं मी हे?" पुरेशी कटकट केली, की तो संतापून मला मारतो. म्हणजे फार नाही, पण मारतो. मग मी रडारड करते. त्याच्याशी अबोला धरते. असे एकदोन दिवस गेले, की तो मला बोलते करायला नव्या ड्रेसच कापड आणून देतो! शिवण तर काय, आपण घरीच करतो!" जरा वेळाने चंदा म्हणते, "आणि हो, पगाराच्या दिवसाच्या आसपास हे नाटक करायचं, फार आधीनंतर नाही!"
पुढचा पगाराचा दिवस जवळ येतो. नवरे घरी येतात. जरा आधी चंदाने आठवण करून दिलेली असते. अर्धा तास जातो. कमल रडतरडत चंदाकडे येते. म्हणते, "नाही जमत! सगळ तू सांगितलंस तस केलं!" "मग?", चंदा विचारते. कमलचे रडणे वाढते. "तो भांडी घासतो आहे!"


ओ. हेन्री या अमेरिकन कथाकाराच्या " A Harlem Tragedy" या कथेचं हे संक्षिप्त भाषांतर. आपल्या योजनांचं 'फळ' आपल्याला अपेक्षित तेच मिळेल याची खात्री नसते!

नंदा

गोताखोर- पं. आनंद शर्मा

मै गोताखोर, मुझे गहरे जाना होगा,
तुम तट पर बैठ भंवर से बातें किया करो.

मै पहला खोजी नहीं अगम भवसागर का,
मुझसे पहले इसको कितनो ने थाहा है,
तल के मोती खोजे परखे बिखराए हैं,
डूबे हैं पर मिट्टी का कौल निबाहा है.
मैं भी खोजी हूं, मुझमे उनमे भेद यही,
मैं सबसे महंगे उस मोती का आशिक हूं,
जो मिला नहीं, वो पा लेने की धुन मेरी,
तुम मिला सहेजो घर की बातें किया करो
मै गोताखोर, मुझे…..

पथ पर तो सब चलते हैं, चलना पड़ता है,
पर मेरे चरण नया पथ चलना सीखे हैं,
तुम हंसो मगर मेरा विश्वास ना हारेगा,
जीने के अपने अपने अलग तरीके हैं.
जिस पथ पर कोई पैर निशानी छोड़ गया,
उस पथ पर चलना मेरे मन को रुचा नहीं,
कांटे रौदूंगा, अपनी राह बनाउंगा,
तुम फ़ूलों भरी डगर की बातें किया करो,
कोई बोझा अपने सिर पर मत लिया करो.
मै गोताखोर, मुझे

नैनो के तीखे तीर, कुन्तलों की छांया,
मन बांध रही जो यह रंगो की डोरी है,
इन गीली गलियों मे भरमाया कौन नहीं,
यह भूख आदमी की सचमुच कमजोरी है.
पर अपने पे विजय नहीं जिसने पायी,
मैं उसको कायर कहता हूं पशु कहता हूं,
बस इसीलिए मैं वीरानो में रहता हूं,
तुम जादू भरे नगर की बातें किया करो,
जब जब हो जरा उतार और पी लिया करो
मै गोताखोर, मुझे

पथ पर चलते उस रोज़ बहार मिली मुझे,
बोली गायक मैं तुमसे ब्याह रचाऊंगी,
ऐसा मनमौजी मिला नहीं दूजा कोई,
जग के सारे फ़ूल तुम्हारे घर ले आऊंगी,
मैं बोला मेरा प्यार, सदा तुम सुखी रहो,
मेरे मन को कोई बंधन स्वीकार नहीं,
तब से बहार से मेरा नाता टूट गया,
तुम फ़ूलों को अपनी झोली में सहेज रख लिया करो,
मुझसे केवल पतझड़ की बातें किया करो.
मै गोताखोर, मुझे

निर्माणीच्या नजरेतून

अनुगड़ेवाडी जिल्हा सातारा येथील ऊसतोड़ कामगारांच्या वस्तीत काढलेला फोटो.  Survey साठी  आलेल्या टीम कड़े मोठ्या उत्सुकतेने अगदी मोठ्या माणसा सारखी पहाताना ही छोटीसी मुलगी

छायाचित्रकार: अद्वैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com

व्यंकचित्र, ऑगस्ट २०१३

सौजन्य- वेंकटेश अय्यर, venkyx@gmail.com
 

Thursday, 1 August 2013

चॉकलेट पार्सल, ऑगस्ट २०१३

१/८/१३
प्रिय युवा मित्र,
            ‘शब्द’ हा माणसाने लावलेला मोठा शोध. जीवनातील एखाद्या वस्तूला किंवा अनुभवाला प्रतीक रूपाने शब्दाद्वारे प्रकट करणे ही माणूस प्राण्याची प्रचंड मोठी बौद्धिक उडी होती. त्यामुळेच भाषा, विचार व संस्कृती शक्य झालेत.
            शब्द प्रथम केवळ मौखिक होता. त्यामुळे शब्दांमधून ज्ञान पसरण्यावर मर्यादा होत्या. नंतर गटेनबर्गच्या छपाईमुळे तो शब्द छापता यायला लागला. त्याबरोबर शब्द व माहिती पसरण्याची गती व व्याप्ती हजारो पटींनी वाढली. वाचन व वाचक वाढले. आज आपण जे आहोत, जसे आहोत त्यात छापील शब्द या हनुमान उडीचा मोठा वाटा आहे.
            गेल्या वीस वर्षांत शब्दाने कागदाचा आधार सोडला, व तो इलेक्ट्रॉनिक झाला. तो इंटरनेट, कॉम्प्युटर व मोबाईल फोनची स्क्रीन याद्वारे प्रवाहित झाला. याचे परिणाम किती मोठे व व्यापक होतील हे तर अजून आपण पूर्ण बघितलेलेच नाहीत. रोज हे क्षितीज पुढे सरकते आहे.
            जगात इतकं लिहिलं गेलं, लिहिलं जातंय, पण त्यातला अब्जांश देखील आपण वाचू शकत नाही. मात्र ‘वाचाल तर वाचाल’ हे शब्दशः खरे आहे.
            निर्माणमधील युवा मित्रांनी काय वाचावे? पुस्तके तर जरूर वाचावीत. त्यांची चर्चा आपण शिबिरात करतोच. पण सोबत छोटे, सारगर्भ विविध विषयांवर सहज काय वाचावे?
            माझ्या वाचनात अलीकडे आलेले असे काही निवडक लेख दर महिन्यात तुम्हाला पाठवण्याचा विचार आहे.
            दर महिन्यात हे छोटेसे ‘चॉकलेट्सचे पार्सल’ तुम्हाला पाठवीन. बरेचदा चॉकलेट्स इंग्रजी असतील.
            चॉकलेट कसे वाटले? त्यातील विचारांबद्दल प्रतिक्रिया? जरूर परत पाठवा.
तुमचा
नायना
संलग्न: चॉकलेट पार्सल

*****
या पार्सलमध्ये काय पहाल?

गृत्समद: आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे राहणाऱ्या गृत्स्मद ऋषींनी वेदिक काळात कापसाच्या लागवडीचा जगातला पहिला प्रयोग केला. गृत्स्मद ऋषींबद्दल आणि त्यांच्या प्रयोगांबद्दल हा विनोबांचा लेख !

The march of protest: एकामागून एक, सोशल मेडीयाच्या मदतीने थक्क करायला लावणाऱ्या वेगाने पसरलेली, मध्यमवर्गीय सर्वसामान्यांनी केलेली ही आंदोलने. त्यांची शक्तीस्थाने, मर्यादांसह Bird’s eye view दाखवणारा हा लेख...

Abused and wounded: हिमालय पर्वतरांग ही जगातली सर्वांत तरुण पर्वतरांग ! धूप, भूस्खलन, भूकंप, ढगफुटी इ. संकटांसाठी अतिसंवेदनशील. उत्तराखंडमधील बेताल पर्यटन, अशास्त्रीय बेकायदेशीर खाणकाम, जलविद्युत प्रकल्प, तसेच धरणे यांनी १६ जूनच्या विध्वंसक पुराला कसा हातभार लावला?  



गृत्समद

‘नयी तालीम’ पद्धतीत एखादे काम करण्याला जेवढे करण्याला महत्त्व, तेवढेच आपल्या करण्याचा परिणाम तपासण्याला आणि तेवढेच ते काम अधिक चांगले कसे करता येईल याचा अभ्यास करून ते पुन्हा करण्याला. अशा प्रकारच्या कृतीशील संशोधनाचे एक प्राचीन भारतीय प्रतीक म्हणजे गृत्समद ऋषी ! आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे राहणाऱ्या गृत्समद ऋषींनी कापसाच्या लागवडीचा जगातला पहिला प्रयोग केला. गृत्समद ऋषींबद्दल आणि त्यांच्या प्रयोगांबद्दल हा विनोबांचा लेख !









तुम्हाला 'गृत्समद' हा लेख आवडला का?