दोन मैत्रिणी
असतात, कमल आणि चंदा म्हणूया. दोघीही एका
चाळीत राहणाऱ्या. दोघींचेही नवरे एका कारखान्यात काम करणारे. कमलचे कपडे नेहेमीच
साधे, तर चंदा दर काही दिवसांनी नव्या ड्रेसमध्ये दिसणारी.
एकदा कमल चंदाला याचं रहस्य विचारते-- चाळीत इतक्या
सटासट नवे कपडे आश्चर्याचेच.
चंदा सांगते, "दर काही दिवसांनी नवरा घरी परतल्यावर मी त्याच्यामागे कटकट
करते, "मी आपलं दिवसभर स्वयंपाकपाणी आणि धुणीभांडी करायची,
आणि तू मात्र घरी येऊन गरम चहाची ऑर्डर सोडायचीस. का सहन करायचं मी हे?"
पुरेशी कटकट केली, की तो संतापून मला मारतो.
म्हणजे फार नाही, पण मारतो. मग मी रडारड करते. त्याच्याशी
अबोला धरते. असे एकदोन दिवस गेले, की तो मला बोलते करायला नव्या ड्रेसच कापड आणून देतो! शिवण तर काय, आपण घरीच करतो!" जरा वेळाने चंदा म्हणते,
"आणि हो, पगाराच्या दिवसाच्या आसपास हे नाटक करायचं, फार आधीनंतर नाही!"
पुढचा पगाराचा
दिवस जवळ येतो. नवरे घरी येतात. जरा आधी चंदाने आठवण करून दिलेली असते. अर्धा तास
जातो. कमल रडतरडत चंदाकडे येते. म्हणते, "नाही जमत! सगळ तू सांगितलंस तस केलं!" "मग?", चंदा विचारते. कमलचे रडणे वाढते. "तो भांडी घासतो आहे!"
ओ. हेन्री या
अमेरिकन कथाकाराच्या " A Harlem Tragedy" या कथेचं हे संक्षिप्त भाषांतर. आपल्या योजनांचं 'फळ'
आपल्याला अपेक्षित तेच मिळेल याची खात्री
नसते!
नंदा
No comments:
Post a Comment