जळगाव येथे
हर्षदा बारी आणि मनोज साळवे या तरुण जोड़प्याने आंतरजातीय विवाहास होणाऱ्या घरच्यांच्या
विरोधास बळी पडून आत्महत्या केली.
गेल्या काही वर्षांत जळगावमधे अशा
आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून हे कोठेतरी थांबावे व आंतरजातीय
विवाहास इच्छुक जोडप्यांना आपल्या पाठीशी खंबीरपणे कोणीतरी उभे आहे अशी खात्री देण्यासाठी सामाजिक
सामाजिक संस्थांनी एकत्र यावे या जाणीवेतून वर्धिष्णु (निर्माण ४ चा अद्वैत दंडवते
व मित्रमंडळींद्वारा स्थापित), जळगाव
जिल्हा महिला असोसिएशन, भरारी
फाउंडेशन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिति यांनी
पुढाकार घेउन ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
जातीअंतासाठी आंतरजातीय
विवाहास नेहमीच एक प्रभावी माध्यम मानले गेले आहे. मात्र आजही पुढारलेल्या
महाराष्ट्रात आंतरजातीय विवाहास प्रचंड विरोध होतो हे आपले वैचारिक दारिद्र्य
असल्याचे मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले. याचबरोबर
त्यांनी जातपंचायतींनी आंतरजातीय विवाह करण्यास इच्छुक जोडप्यांना किती क्रूरपणे
ठार मारले आहे हे काही
केसेसमधून लोकांसमोर मांडले. तसेच त्यांचे वाढते महत्त्व
समाजस हानिकारक असल्याची चिंता व्यक्त केली .
याप्रसंगी जेष्ठ विचारवंत प्रा.
शेखर सोनाळकर व अ.नी.स. चे प्रा.
व्ही. एस. कट्यारे यांनीदेखील उपस्थितांना
मार्गदर्शन केले. या प्रक्रियेचे
पुढचे पाउल म्हणून अ. नी. स.
तसेच इतर सामाजिक संस्थांतर्फे एकत्र
येउन जळगाव येथे आंतरजातीय
विवाह समुपदेशन केंद्र सुरु करण्यात येत आहे. आपल्याला जातीपातीची अनिष्ट प्रथा
बंद होण्यासाठी काय करता येईल?
No comments:
Post a Comment