'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 1 August 2013

Abused and wounded

हिमालय पर्वतरांग ही जगातली सर्वांत तरुण पर्वतरांग ! धूप, भूस्खलन, भूकंप, ढगफुटी इ. संकटांसाठी अतिसंवेदनशील असणारा हा प्रदेश. अशा पर्वतरांगांच्या कुशीतल्या उत्तराखंडमधील बेताल ‘विकास’ हे नुकत्याच झालेल्या विध्वंसाचे कारण आहे का? उत्तराखंडची लोकसंख्या १.४ कोटी. गेल्या वर्षांतील अवघ्या मे-नोव्हेंबर या ४ महिन्यांत या राज्यात तब्बल २.८ कोटी पर्यटकांनी भेट दिली. राज्यात एक दशलक्ष पर्यटकांमागे केवळ १०२ वैध हॉटेल्स आहेत. त्यामुळे नदीच्या काठी उभारलेली अनेक अवैध हॉटेल्स पुरासोबत वाहून गेली. या आपत्तीत गंगेकाठचे अशास्त्रीय बेकायदेशीर खाणकाम, जलविद्युत प्रकल्प, तसेच धरणे योगदान काय? Down To Earth मधील हा लेख जरूर वाचा...



तुम्हाला 'Abused and wounded' हा लेख आवडला का?

No comments:

Post a Comment