आषाढी एकादशी हा
महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या सणांपैकी एक. संत ज्ञानेश्वर पालखी व संत तुकाराम
पालखीसोबत दरवर्षी सुमारे १०-१२ लाख वारकरी आळंदी व देहू येथून चालत चालत आषाढी
एकादशीला पंढरपूरला पोचतात. अंतर मोठे असल्याने वारकऱ्यांना हमखास अशक्तपणा, पाय दुखणे, बूट चावून पायाला जखमा इ.
समस्यांसोबतच अतिसार, जुलाब व इतर संसर्गजन्य रोगांना तोंड
द्यावे लागते. त्यांची वैद्यकीय गरज पूर्ण करण्यासाठी सह्याद्री मानव सेवा मंच ही
स्वयंसेवी संस्था दरवर्षी तपासणी व उपचार शिबीरे घेत असते. प्रणव नाफडे (निर्माण ४) या संस्थेसोबत २००८
पासून कार्यरत असून शिबीर आयोजनात (कॅम्प लावणे, प्रवास, सामान पोचवणे, जेवण)
त्याची जबाबदारी तो दरवर्षी पार पाडतो. प्रणव इंजिनियर असला तरी प्रथमोपचार,
तसेच स्नायूंमध्ये इंजेक्शन देणे इ. कौशल्ये शिकला आहे.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgr3zk6FwmBtnX7HKJMfkGSa0tOvLbcCmSU9JvHrpj61cGIpJgzkTrqmYuSvbhcQBeDSr8TG4CSS9IxGTGk64pAufBQIDQJc1_mz4PMec1TyG3gPaYLPf1n8JFc2ftgKZGub2GIVJ92fUBw/s320/2.jpg)
वारी ही अतिशय गतिमान प्रक्रिया. वारीतील रुग्णतपासणी हे
दवाखान्यातील रुग्णतपासणीपेक्षा फार वेगळे आव्हान आहे. इतक्या गर्दीत शिबिराचे
आयोजन करणे हे रुग्णतपासणी करण्याइतकेच गुंतागुंतीचे व आव्हानात्मक काम. यासाठी
सह्याद्री मानव सेवा मंचला तरुण, उत्साही स्वयंसेवकांची गरज भासते. याशिवाय
सह्याद्री मानव सेवा मंच दर महिन्यात ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागातही आरोग्य
शिबिरांचे आयोजन करतो. या दोन्ही कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रणव नाफडेशी
संपर्क साधा.
स्त्रोत- प्रणव नाफडे, pran.296@gmail.com
No comments:
Post a Comment