'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 11 August 2013

पुस्तक परिचय

मनोगती- डॉ. आनंद नाडकर्णी

‘मनोगती’ हे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे एक उत्कृष्ठ पुस्तक ! माझं मराठीतील दुसरंच पुस्तक असल्याने भाषा थोडीसी कठीण वाटली, पण असे नाही की तुम्हालाही जड जाईल.
डॉ. नाडकर्णी आणि ठाणे येथील Institute for Psychological Health (IPH) हे connection आपल्या सर्वांना माहीतच आहे. या माहितीमध्ये त्यांच्या अनुभवांची भर पडावी असे हे पुस्तक. या पुस्तकात डॉ. नाडकर्णी आपल्या पेशंट्स सोबत आलेले अनुभव मांडतात. त्याचसोबत मानसशास्त्रातील काही महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाश टाकतात. या पुस्तकात डॉ. अल्बर्ट एलिस ह्या मानसशास्त्रज्ञाची Rational Emotive Behavior Therapy (REBT) ही मानसोपचार पद्धती आणि आपली संत परंपरा, तसेच गीता यांचा सुंदर संगम मांडून पेशंटच्या समस्या कशा सोडवल्या हे सांगितले आहे. एखाद्या पेशंटला जर असा डॉक्टर मिळाला की जो औषधोपचाराबरोबरच देवावर विश्वास दाखवत अभंग, संतवाङ्मय,गीतेतील श्लोक इ. द्वारा आपल्या आजारावर मात करण्याचा मार्ग दाखवतो, तर त्याहून अधिक सहजता उपचारांत निर्माण करणे शक्य आहे असं मला वाटत नाही. ज्ञानेश्वरीतील कृष्ण ते अभंगांतील तुकाराम हे सगळे आपल्याच व्यक्तिमत्वाला अधिक सुंदर बनवण्याकरता, माणूस म्हणून जगण्याच्या या प्रवासाला सजवण्याकरता नेहमीच आपल्या पुराणात होते, पण हे आपल्याला कधी समजलेच नाही. हा बदल हे पुस्तक घडवून आणते.
या पुस्तकात डॉ. नाडकर्णी सोप्यापासून सुरुवात करत आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक सकारात्मक कसं करता येईल व आपला दृष्टीकोन कसा बदलता येईल याबद्दल आपल्याला सांगतात. आजच्या rat race मध्ये तणाव सर्वांनाच येतो. या तणावाला कसे हाताळायचे हे अगदी पद्धतशीरपणे समजावून सांगतात. त्यांच्या पुस्तकातील हे वाक्य self explanatory आहे: Nothing is either good or bad, thinking makes it so. त्यांची A (activating event) à B (belief) à C(consequences) ही कल्पना खूप खास आहे. Activating belief consequences event. आपण नेहमी C वर, म्हणजेच  result वर लक्ष केंद्रित करत असतो. पण C पर्यंत पोहोचण्यासाठी जी process (B) आहे, तिचा विचार करत नाही. मग आपल्याला हवा असणारा C (result) कसा मिळेल?
Unconditional Self Acceptance (USA) बद्दल सांगताना ते म्हणतात की आपल्याला गुण व दोषांचा सारखाच स्वीकार करायला हवा. ते गुण-दोष म्हणजेच मी नसून ते माझा भाग आहेत. हे केले तर आत्मस्वीकाराची (USA) वृत्ती वाढते. तेव्हाच आपण अहंपणातून बाहेर पडू. Factors Beyond Control आणि Factors Within Controlह्याचे भान जेव्हा आपल्याला येते, तेव्हा आपण ABC या ट्रॅकवर येतो आणि B चे महत्त्व जाणतो.
लेबल लावणे आणि लेबल स्वीकारणे हे दोन्ही माणूस म्हणून आपल्या प्रगतीच्या मध्ये येते. म्हणूनच लेबल न लावता वेळीच आपल्या चुका स्वीकारणे महत्त्वाचे.
USA चा पुढचा टप्पा म्हणजे UOA (Unconditional Others’ Acceptance) आणि UWA (Unconditional World Acceptance) हे त्यांनी खूपच सुंदरपणे एकनाथांच्या काही ओळींद्वारे मांडले आहे. आपल्या विचार करण्यात, वागण्यात, दृष्टीकोनात बदल घडवून आणल्याने कसे हे जगदेखील बदलते हे त्यांनी सांगितले आहे.
डॉ. एलिस यांच्या विचार, भावना, वर्तन या Triad व भारतीय परंपरेतील ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग आणि कर्ममार्ग यांच्यात समानता आहे हे पुस्तक वाचताना लक्षात येते.
Self talk चे आपल्या आयुष्यातले महत्त्व व त्याचा परिणाम आपल्या वाणीत, वागण्यात कसा उद्भवतो हे समजावताना ते सांगतात की आपल्याच सोबत सुसंवाद करणे किती महत्त्वाचे व गरजेचे आहे.
Addiction सारख्या समाजातील मोठ्या समस्येला आपण वैयक्तिक स्तरावर कसे तोंड देऊ शकतो याबद्दल बोलताना living and longing आणि craving यातील फरक ते समजावतात.
पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात IPH मध्ये वापरण्यात येणाऱ्या group therapies मध्ये मंत्र, जप यांचा समावेश कसा व का असतो हे ते सांगतात. आपल्या विचारांचे भान कसे आणायचे व त्याकरिता विलय (Integration) आणि विलग (Dissociation) यांचे महत्त्व ते सांगतात.
शेवटी मृत्यूसारख्या भयावह परंतु कटू सत्य असणाऱ्या वस्तुस्थितीला अधिक चांगल्या रितीने आयुष्यात स्वीकारून मृत्यूच्या भयापासून कसे दूर जाता येईल याचे शिक्षण ते देतात.
पुस्तक वाचताना बरेचदा असे झाले की भाषा क्लिष्ट वाटली, कधीकधी एखादी संकल्पना समजली नाही. पण त्याचबरोबर अनुभव आला की आपणही तणावग्रस्त होतो, घाबरतो, रागाच्या आहारी जाऊन चुकीचे वर्तन करतो. हे पुस्तक सर्वांनाच काहीतरी देईल. निव्वळ फरक हाच की कोण किती घेण्याच्या तयारीने वाचतोय.
(हा पुस्तक परिचय वाचून जर कोणी हे पुस्तक वाचले आणि त्यांना पुस्तकाबद्दल चर्चा करायची असेल तर मला नक्की आवडेल. कारण खूप गोष्टी मलाही अजूनपर्यंत समजल्या नाहीत.)

पल्लवी बापट, trendsetters.palloo@gmail.com

2 comments:

 1. विचार, भावना, वर्तन आणि भारतीय परंपरेतील ज्ञानमार्ग, भक्तीमार्ग, कर्ममार्ग यांच्यातील समानता आनंद काकांनी कशी स्पष्ट केली आहे, हे जाणून घ्यायला हवं. पुस्तकं वाचून झालं की पल्लवी तुला कॉनट्याक्ट करेन. थ्यांक्स फॉर दि इंट्रोडक्शन टू दि बुक.

  कल्याण

  ReplyDelete
 2. GOOD INTRO OF THE BOOK ,TE VACHALYAVAR BOOK VACHAYCHI ICCHA NIRMAN ZALIYE NAKKI VACHEL

  THANKS & REGARDS......

  BHUSHAN

  ReplyDelete