डॉ. विठ्ठल साळवेचे
असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात काम सुरू
हृदयविकार, लकवा इ. Cardiovascular diseases हे भारतातील मृत्यूंचे सर्वांत मोठे कारण आहे. हृदयविकार, उच्च रक्तदाब,
मधुमेह यांचे भारतातले प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत मुख्यतः संसर्गजन्य रोगांवर भर
देणाऱ्या सरकारी यंत्रणेला असंसर्गजन्य रोगांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक वाटू
लागले आहे. याचाच परिणाम म्हणून भारत सरकारने १०० जिल्ह्यांत राष्ट्रीय
असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा पथदर्शी प्रयोग सुरू केला आहे. याच
कार्यक्रमाअंतर्गत डॉ. विठ्ठल साळवे ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात (जि.
चंद्रपूर) वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला आहे. हृदयविकार होण्याचा ज्यांना
धोका अधिक अशा मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना गावपातळीवरच तपासणी करून
ओळखणे, cancer च्या रुग्णांच्या तालुका पातळीवर होऊ शकणाऱ्या
तपासण्या करणे व तालुका पातळीवर तपासणी/उपचार होऊ न शकणाऱ्या रुग्णांना जिल्हा
रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करणे, असंसर्गजन्य रोग होऊ नयेत यासाठी
आरोग्यशिक्षण करणे या विठ्ठलच्या काही जबाबदाऱ्या असतील.
विठ्ठलने याआधी १ वर्ष कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात (जि. गडचिरोली)
तर ८ महिने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागात वैद्यकीय अधिकारी
म्हणून काम केले आहे. या अनुभवाचा त्याला नक्कीच फायदा होईल.
No comments:
Post a Comment