मंदार देशपांडेने
(निर्माण ४) जेव्हा सेंद्रीय शेती आधारित जीवन जगण्याचे ठरवले तेव्हा त्याने धीरेंद्रभाई
सोनेजी आणि स्मिता बेहेन सोनेजी यांच्याकडे गुजरात येथे दीड वर्षे सेंद्रीय शेतीचे
प्रशिक्षण घेतले होते. कल्याणी राउत, हर्षल झाडे, भूषण देव (सर्व निर्माण ५) व
मित्रमंडळींनी मंदारच्या शेतावर नुकतीच धीरेंद्रभाईंचा मुलगा भार्गवची भेट घेतली.
एकही वर्ग शाळेत न
गेलेला भार्गव व त्याचे कुटुंब २ एकर सेंद्रीय शेतीत विविध प्रकारचे धान्य, २५
प्रकारच्या भाज्या आणि ३५ प्रकारच्या फळे घेतात. मीठ, गूळ अशा कमीत कमी वस्तूंसाठी
बाजारावर अवलंबून रहावे असा त्यांचा प्रयत्न राहतो. शेती सोबतच व्यवसाय आणि
गृह-उद्योगाचाही त्यांच्या अर्थव्यवस्थेत हातभार आहे. भार्गव सौर उपकरणे
दुरुस्तीसोबत इलेक्ट्रिक फिटिंग, प्लम्बिंग, शेतीसंबंधित कामे अशी जीवनावश्यक कामे
तत्परतेने करू शकतो. पाबळ विज्ञान आश्रमात त्याने १ वर्ष प्रशिक्षण घेतले आहे.
पुस्तकी ज्ञानापेक्षा
कौशल्ये व अनुभवसंपन्न ज्ञान परिपूर्ण जीवन जगण्यासाठी महत्वाचे असल्याचे शिकायला
मिळाल्याचे कल्याणीने सांगितले.
No comments:
Post a Comment