सर्चतर्फे
धानोरा तालुक्यातील एकूण ४५ आदिवासी गावांमध्ये लोकसहभागातून मलेरिया नियंत्रण
कार्यक्रम चालवला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत मच्छरदाण्यांचे वाटप, घराच्या आसपास श्रमदानातून
साठलेल्या पाण्याचा निचरा, आरोग्यशिक्षण, आरोग्य सेवकांमार्फत औषधोपचार इ. उपक्रम
राबवले जातात. मे २०१२ मध्ये सर्चतर्फे गावकऱ्यांसाठी अधिक काळ टिकणाऱ्या ५००० आणि
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अल्प काळ टिकणाऱ्या १०५० मच्छरदाण्या मोफत
मिळाव्यात म्हणून अनुदान प्रस्ताव देण्यात आला होता. तब्बल एका वर्षाने एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे हा प्रस्ताव संमत झाला असून सर्चला ४५ गावांमधील
१०,००० लोकसंख्येसाठी अल्प काळ टिकणाऱ्या ५००० मच्छरदाण्या आणि त्यासाठी लागणारे
औषध ऑगस्ट २०१३ मध्ये आदिवासींसाठी उपलब्ध झाल्या आहेत. अहवालाच्या मूळ मसुद्यात
अनेकदा बदल करणे व एक वर्ष शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये या प्रस्तावाचा
पाठपुरावा करण्यात प्रामुख्याने सर्चचे तुषार खोरगडे, डॉ. आनंद बंग आणि चारुता
गोखले (निर्माण १) यांचा सहभाग होता.
२००७
मध्ये या ४५ गावांसाठी शासनातर्फे २००० मच्छरदाण्यांचा पुरवठा झाला होता. त्यानंतर
गेले सहा वर्ष धानोरा तालुक्याला मच्छरदाण्यांचा पुरवठा अत्यंत अपुरा आणि अनियमित
होत आहे. सर्चतर्फे गावकऱ्यांना दरवर्षी अल्प किंमतीमध्ये मच्छरदाण्या विक्रीस
उपलब्ध असतात. परंतु आर्थिक चणचणीमुळे मर्यादित लोक या वापरताना दिसतात. यावर्षी
मात्र शासनातर्फे मच्छरदाण्या मोफत मिळाल्यामुळे अधिक लोकांना याचा लाभ घेणे शक्य
होणार आहे.
No comments:
Post a Comment