सुनील मेकाले (निर्माण २) फेब्रुवारीपासून बिहारमध्ये Alliance India या संस्थेबरोबर देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या प्रश्नांवर काम करत आहे.
पाटणा, मधुबनी आणि मुजफ्फरपूर या तीन जिल्ह्यांमध्ये स्थलांतर मोठ्या प्रमाणावर
होते. तेथील ‘मुशाहर’ या जमातीच्या देहविक्रय करणाऱ्या महिलांचे एच.आय.व्ही. एड्स
पासून संरक्षण करणे, त्याविषयी त्यांचे आरोग्यशिक्षण करणे, नियमित आरोग्याची
तपासणी करणे तसेच बचत गटाद्वारे त्यांचे संघटन करणे असे सुनीलच्या कामाचे स्वरूप
आहे. नेपाळमधून अनेक स्त्रिया देहाविक्रीसाठी बिहारमध्ये आणल्या जातात. सुनीलची
संस्था याही महिलांच्या समस्यांवर काम करते.
याआधी सुनील पंजाबमध्ये याच विषयावर काम करत होता. गेल्या काही
वर्षांच्या या अनुभवावर आधारित ‘वेश्याव्यवसाय’ हा विषय घेऊन पीएचडी करण्याचा
सुनीलचा विचार आहे. सुनीलला पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
स्त्रोत- सुनील मेकाले
No comments:
Post a Comment