'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

सर्चच्या फिरत्या दवाखान्यास आदिवासी गावांचा प्रचंड प्रतिसाद


वैभव आगवणे

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना’ आणि ‘सर्च’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या फिरत्या दवाखान्यातर्फे आदिवासी गावांमध्ये प्रत्यक्ष सेवा देण्यास सुरुवात झाली असून या दवाखान्यास आदिवासी गावांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 18 दिवसात दवाखान्याची 39 गावांची पहिली फेरी पूर्ण झालेली असून आत्तापर्यंत एकूण 2095 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. निर्माण 2 चे डॉ.  वैभव आगावणे हे या गटाचे प्रमूख असून त्यांच्याबरोबर एकूण 6 जणांची टीम काम करत आहे. फिरत्या दवाखान्याची पहिली फेरी यशस्वी करण्यात सर्चचे उपसंचालक ‘तुषार खोरगडे’ आणि आदिवासी भागातील सुपरवायजर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या सर्व चमूचे हार्दिक अभिनंदन! 

मां दंतेश्वरी फिरते रुग्णालय, सर्च, गडचिरोली





No comments:

Post a Comment