'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

‘अझीम प्रेमजी फाऊंडेशन’ आणि ‘निर्माण’ एकत्र काम करण्याबाबत अमृत बंग ची बॅंगलोरला भेट


अमृत बंग
विप्रो कंपनीचे मालक अझीम प्रेमजी यांनी स्थापन केलेली  अझीम प्रेमजी फाऊंडेशन’ हे गेले दहा वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत आहे. विकासाच्या क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी घडवण्याच्या उद्दिष्टाने त्यांनी बॅंगलोर येथे अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीची स्थापना केली आहे आणि त्याअंतर्गत Masters in development आणि Masters in education हे कोर्सेस सुरु केले आहेत. त्याच्या पहिल्या बॅचमध्ये सध्या 100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासंदर्भात ‘निर्माण’ आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन’ हे भविष्य़ात एकत्र काम करू शकतील का यावर चर्चा करण्यासाठी अमृत बंग ने बॅंगलोरला भेट दिली. तसेच ‘निर्माण’ शिक्षणप्रक्रियेच्या धर्तीवर गुजरातमध्ये अशाप्रकारचा एखादा उपक्रम सुरु करता येईल का याविषयीही गुजरात विद्यापीठ , IIM अहमदाबाद आणि ‘निर्माण’मध्ये चर्चा सुरु झाली आहे. पाच वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ‘निर्माण’बरोबर आज IIM सारख्या नावाजलेल्या शिक्षणसंस्था काम करू इच्छितात हे निर्माण गटासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.           


No comments:

Post a comment