आदिवासी जत्रेत सुमारे ४० गावांचे प्रतिनिधी एकत्र येऊन
सर्चच्या कार्यक्रमाचा मागील वर्षाचा आढावा व पुढील वर्षाच्या नियोजनाविषयी चर्चा
करतात. त्याआधारे पुढील वर्षाचा कृती-कार्यक्रम ठरवला जातो. मात्र गेल्या काही
वर्षांच्या निरीक्षणानुसार मूलतः अबोल असणारे आदिवासी या चर्चेत म्हणावे तसे खुलत
नाहीत. त्यामुळे यावर्षीच्या जत्रेत
कलाप्रिय आदिवासींचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने चर्चेऐवजी दोन interactive संगीत-नाटकांचे आयोजन करण्याची
कल्पना नायनांनी सुचवली. सर्चमधील निर्माणींनी यात सहभाग नोंदवला. नाटकांमध्ये
आदिवासींच्या आवडत्या चालींवर गाणी, विनोद, कलाकारांचा प्रेक्षकांच्यामधून
व्यासपीठावर प्रवेश, कलाकारांचा प्रेक्षकांसोबत संवाद, आदिवासी गावात घडणारे
प्रवेश (उदा. ग्रामसभा) इ. तंत्रांचा वापर करण्यात आला. आदिवासींसोबत कामाचा
प्रदीर्घ अनुभव असणारे तुषारभाऊंनी नाटकाचे दिग्दर्शन केले.
आदिवासी भागातील सर्चच्या
उपक्रमांचा आढावा हा पहिल्या नाटकाचा विषय होता, तर आदिवासींना नुकत्याच
मिळालेल्या अधिकारानुसार बांबूकटाई व विक्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांचा
विनियोग हा दुसऱ्या नाटकाचा विषय होता. नंतर झालेल्या गटचर्चेत आदिवासी मागील
वर्षांपेक्षा जास्त खुलाल्याचे निरीक्षण आदिवासी नेते श्री. हिरामण वरखडे यांनी
नोंदवले.
No comments:
Post a Comment