सर्चमध्ये नुकतेच झालेले शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करण्यात
निर्माणच्या तरुण डॉक्टरांनी मोलाची भूमिका बजावली. सांगली, कोल्हापूर व अकोला येथून
आलेले शल्यविशारद व भूलतज्ञ यांच्यासोबतच निर्माणचे अभिजीत सफई, महेश पुरी, श्रेयस
गोडबोले, अभिषेक, आरती गोरवाडकर, रश्मी गायकवाड, तरू जिंदाल, ऋतुजा आणि सर्चचे
निवासी डॉक्टर्स व नर्सेस यांच्या अथक परिश्रमांतून गडचिरोली व आजूबाजूच्या
जिल्ह्यांमधल्या ग्रामीण भागातील ८५ रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार
पडल्या.
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment