छायाचित्र: प्रेरणा राउत
छायाचित्राबद्दल:
‘कोमकर’ खेड्यातील आरोग्यसेविका उच्च रक्तदाबाच्या रुग्णाचे बीपी मोजताना...
कोमकर घनदाट
जंगलात वसलेले असून ग्रामीण रुग्णालयापासून ५३ किमी तर प्राथमिक आरोग्य
केंद्रापासून २५ किमी लांब आहे. या दुर्गम भागात सार्वजनिक वाहतुकीची सोय नाही.
भारत आधीच
न्यूमोनिया, हागवण, मलेरिया इ. साथीच्या रोगांपासून पीडित असताना हृदयविकार, लकवा, उच्च रक्तदाब, मधुमेह इ.
असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे. सध्या हे रोग भारतातील एकूण मृत्यूंपैकी
सर्वाधिक मृत्यूंना कारणीभूत असून ग्रामीण भागातही मृत्यूच्या एकूण कारणांमध्ये हे
प्रमुख कारण आहेत. या रोगांसाठी आयुष्यभर उपचार घेण्याची गरज असते. संसाधने व
आरोग्यसुविधांची कमतरता असणाऱ्या खेड्यांमध्ये या रोगांमुळे गरीबीची नवी लाट येईल
अशी भीती व्यक्त होत आहे. आपण या लाटेला तोंड द्यायला तयार आहोत का? कोमकरसारख्या दुर्गम गावांत आरोग्यसेवा पोहोचणं खरंच कठीण आहे. गावागावातल्या
आरोग्यसेवकांनी आजवर गरोदरपणा, लहान मुलांच्या गंभीर
आजारांचे व्यवस्थापन यशस्वीरित्या केले आहे. असंसर्गजन्य रोगांच्या
व्यवस्थापनासाठी गावागावातले प्रशिक्षित आरोग्यसेवक हे उत्तर असू शकेल?
No comments:
Post a Comment