निर्माण ४ची स्मिता तोडकर व निर्माण ५चा
केदार आडकर ‘सर्च’मध्ये रुजू झाले आहेत. स्मिता ही शिक्षणाने आयुर्वेदिक डॉक्टर
असून सर्चमध्ये ती बाह्यरुग्ण विभागातील रुग्णतपासणीसोबतच आंतररुग्ण विभागाचे व
शस्त्रक्रिया शिबिरांचे व्यवस्थापन व परिचारिकांचे प्रशिक्षण इ. जबाबदाऱ्या
सांभाळणार आहे. यापूर्वी तिने आंध्र प्रदेशमधील भैसा येथे आयुर्वेदाच्या
माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्याचा अनुभव घेतला होता.
केदारने Hospital management मध्ये पदविका घेतली असून त्यानंतर Human
Resources या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सर्चच्या
प्रशासकीय विभागाला तो अतिथीगृहे, मेस व विविध प्रशिक्षणांच्या व्यवस्थापनात मदत
करेल. पहिल्या महिन्यात त्याने श्रमदानाच्या माध्यमातून सर्चमधील प्रक्रियांचे
निरीक्षण करण्यास सुरुवात केलेली आहे. याशिवाय सर्चमधील प्लास्टिकची विल्हेवाट कशी
लावता येईल यासाठी तो प्रयत्नशील आहे.
No comments:
Post a Comment