दोन आकाराने छोट्या कविता पाहा.
१) गाणे
---
छानसे
घरकुल नांदते गुलमोहोराखाली
केवळ कांकणे
किणकिणली असती.
रोजच आला असता
चंद्र खिडकीत
नक्षत्रांपलिकडली
एक दुनिया असती.
भरल्या पोटी अगा
पाहातो जर चंद्र
आम्हीही कुणाची
याद केली असती.
२) बेतून
दिलेलं आयुष्य -----
बेतून दिलेलं
आयुष्य; जन्मलो तेव्हा-
प्रकाशही तसाच
बेतलेला
बेतालेलेच बोलणे
बोललो. कुरकुरत
बेतलेल्याच
रस्त्याने चाललो; परतलो
बेतल्या खोलीत;
बेतलेलेच जगलो
म्हणतात!
बेतलेल्याच रस्त्याने गेलात तर
स्वर्ग मिळेल. बेतलेल्याच
चार खांबात
थूः
दोन्ही कविता नारायण सुर्वे यांच्या आहेत, "माझे विद्यापीठ" या संग्रहातल्या
एक प्रश्न उपस्थित करतो, निर्माणी मित्रमैत्रिणींसाठी. कवितांमधून भावना छान व्यक्त
करता येतात. आणि भावना या पुढे जाऊन कृतींमागचे
"इंजिन" ठरतात. पण या इंजिनाने चालणाऱ्या गाडीचे नियंत्रण मात्र
भावनांनी करता येत नाही. त्यासाठी विचार, विवेक वगैरे
लागतात. तेव्हा विचार-विवेक व्यक्त करणाऱ्या कविता तरी
हव्यात,
किंवा
या टप्प्यावर कवितांचे आभार मानून इतर कोणत्यातरी
साहित्यप्रकाराची मदत घेऊन पुढे जावे लागते.
आता कविता आणि हा पुढचा साहित्यप्रकार यांच्यात 'लहान-मोठे' ठरवता येईल का?
नंदा
No comments:
Post a Comment