निर्माण शिक्षण प्रक्रियेचा एक भाग म्हणून विविध
सामाजिक प्रश्न समजून घेणे व प्रश्न सोडविण्याच्या विविध पद्धतींचा, तत्त्वज्ञानांचा अभ्यास करणे हे
ओघाने आलेच. असेच काही प्रयत्न आपल्या काही मित्र मैत्रिणींनी गेला एक महिनाभर
केलेत. त्याची ही थोडक्यात माहिती.
पुण्यातील अक्षरनंदन ही शिक्षणक्षेत्रातील एक प्रयोगशील
शाळा म्हणून ओळखली जाते. औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मेनकाने
तेथील कार्यपद्धती व शैक्षणिक पद्धती समजून घेण्यासाठी नुकतेच अक्षरनंदनला भेट
दिली
· · निर्माण ५चा प्रफुल्ल वडमारे व निर्माण
४चा मयूर सरोदे यांची पाबळ विज्ञानआश्रमाला भेट
कामातून शिक्षण व जीवनोपयोगी शिक्षण
हे ध्येय मानून पाबळ येथील विज्ञान आश्रम हे खरंतर गांधीजींच्याच नयी तालीम शिक्षण
पद्धतीचे एक प्रत्यक्ष उदाहरण. अर्ध्यातून शाळा सोडलेल्या मुला-मुलींसाठी ही
संस्था उद्योजक बनण्याचा मार्ग उपलब्ध करून देते. Agriculture, Food Technology, Mechanical Workshop आणि Electrical Workshop इ. विषयांमध्ये या
मुलामुलींना प्रशिक्षण दिले जाते. विज्ञान आश्रमाला नुकतेच निर्माण ५चा प्रफुल्ल
वडमारे व निर्माण ४चा मयूर सरोदे यांनी भेट दिली. प्रफुल्ल हा मुळचा कॉम्प्युटर
इंजिनिअर असून मयूर सध्या सौरउर्जेवर काम करत आहे.
· · निर्माण ५चे प्रफुल्ल वडमारे व कल्याणी
वानखेडेची व सोनदरा गुरुकुलम् ला भेट
प्रफुल्ल व
आर्किटेक्ट असलेल्या कल्याणी वानखेडे ह्यांनी बीड मधील डोमरी येथील सोनदरा
गुरुकुलम् ला भेट दिली. आनंदी शिक्षण ह्या ध्येयाने सुरु केलेली ही एक निवासी शाळा
आहे.
· · निर्माण ५च्या युवांची श्री. आनंद कपूर व कुसुमताई कर्णिक ह्यांच्या शाश्वत
संस्थेला भेट
श्रद्धा चोरगी,
श्रीजित कुलकर्णी, वेदवती लेले यांच्यासह निर्माण ५च्या युवांनी मंचर येथील ‘शाश्वत’
संस्थेला भेट दिली. शाश्वत संस्थेचे आनंद कपूर हे आय.आय.टी. मधील सिव्हील इंजिनिअर
असून गेली अनेक वर्ष ते डिंबे धरणामुळे निर्वासित झालेल्या लोकांच्या प्रश्नावर
कार्यरत आहे. निर्वासित लोकांच्या रोजगाराच्या, शिक्षणाच्या, जमिनीच्या अशा सर्व
आघाड्यांवर शाश्वत ही संस्था काम करीत आहे. अधिक माहिती साठी खालील संकेतस्थळ बघा
-
· · पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या कचरा डेपोला भेट – एक उत्साहवर्धक
अनुभव
कचऱ्याचा प्रश्न समजून घेण्याच्या हेतूने मूळच्या
इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर असलेल्या मृण्मयीने नुकतेच पी.सी.एम.सी. च्या कचरा डेपो
ला भेट दिली. मात्र तेथे तिला अपेक्षेपेक्षा वेगळे व उत्साहवर्धक चित्र पहायला
मिळाले. कचऱ्याला वास येऊ नये म्हणून फवारणी केली होती. आजूबाजूचा परिसर अस्वच्छ
वाटू नये म्हणून तेथे एक छोटेखानी बाग बनवली आहे. कचऱ्याचे व्यवस्थित segregation होत असून ओल्या
कचऱ्यापासून खत निर्माण करण्यासाठी नेटका व स्वयंचलित प्लांट उभारण्यात आला आहे.
तसेच खत विकण्यासाठी एका कंपनीशी करार देखील केला गेला आहे.
· · निर्माण ५च्या सतीश सोनावणेची ‘आरती’ला
भेट
जैविक कचऱ्यावर संशोधन करणाऱ्या डॉ. आनंद कर्वे
यांच्या ‘आरती’ या संस्थेला निर्माण ५च्या सतीश सोनावणेने भेट
दिली. घरच्या घरी Biogasची कशी निर्मिती होऊ शकते, पालापाचोळ्यापासून
charcoal (ज्याची calorific
value खाणीतून मिळण्याऱ्या कोळशापेक्षाही
जास्त असते) कसा बनवता येऊ शकतो अशा
पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाविषयी ऐकण्याची व पाहण्याची त्याला संधी मिळाली.
No comments:
Post a Comment