भारतात २००५ मध्ये रोजगार हमीचा कायदा झाला. तेव्हापासून ग्रामीण भागात
रोजगार निर्मिती व त्याबरोबर नैसर्गिक संसाधनांची निर्मिती, संवर्धन व व्यवस्थापन या प्रमुख उद्देशांनी रोजगार हमी
योजनेची (रोहयो) कामे सुरु आहेत. 'रोहयो द्वारा होणाऱ्या
कामांची गुणवत्ता व उपयोग' असा अभ्यास नाशिकमधील ‘प्रगती
अभियान’ या संस्थेच्या वतीने करण्यात आला. गोपाल महाजन आणि अजय होले यांनी हा
अभ्यास केला. नाशिकमधील इगतपुरी, त्र्यंबक आणि पेठ
तालुक्यातील एकूण ९ आदिवासी गावातील ४० कामांचे त्यांनी प्रत्यक्ष सर्व्हेक्षण
केले. यात रोहयोच्या कामांद्वारे तेथील लोकांच्या जीवनात झालेले बदल, उत्पन्न, स्थलांतराचे प्रमाण तसेच कामाची तांत्रिक
गुणवत्ता, शेतीवरील परिणाम इ. चा समावेश होता. तसेच रोहयोचे
गाव पातळीवरील नियोजन व अंमलबजावणी या दोन्ही प्रक्रियांचाही त्यांनी सखोल अभ्यास
केला. हा अभ्यास व त्याच्या विश्लेषणातून मिळालेले निष्कर्ष खूपच महत्वपूर्ण आणि
पुढील कामासाठी उपयोगी आहेत असा त्या दोघांचा अनुभव आहे.
‘प्रगती अभियान’बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.pragatiabhiyan.org/index.html'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment