“सूड आणि त्याच्या बदल्यात सूड या चक्रावर
दोन उतारे शक्य आहेत. एक म्हणजे कोर्टात जाणे. देणीघेणी, त्यांची
मोजमापे, त्यांच्या तुलना, त्यातला
न्याय, हे सारे कोर्टाचे काम. ते नेहेमीच जमते असे नाही,
पण ते जमावे अशी अपेक्षा तरी असते.
“दुसरा उतारा जास्त मूलभूत आहे. दक्षिण
आफ्रिकेच्या वर्णवादी शासनाने नेल्सन मंडेलाला बऱ्याच छळानंतर बराच काळ कैदेत
ठेवले. अखेर जेव्हा त्याला सोडायचे ठरले तेव्हा तो स्वतःला म्हणाला, “ज्यांनी ज्यांनी मला इजा पोचवली आहे, त्यांना त्यांना मी माफ करायला हवे, आणि
तेही ह्या तुरुंगाबाहेर पडायच्या आत. जर मी तसे केले नाही, तर
मी कधीच त्यांच्यापासून मुक्त होणार नाही.” का? कारण मी नेहेमीच सूडाच्या साखळ्यांनी त्यांना जखडलेला राहीन. ते आणि मी
वस्तू आणि तिची सावली यांसारखे नेहेमीच एकमेकांशी जोडलेले राहू.
“थोडक्यात म्हणजे, सूडभावनेवर उतारा न्याय हा नाही,
क्षमा हा आहे.”
Margaret
Atwoodच्या Payback:(Debt, the Shadow Side of Wealth) या पुस्तकातून
तुमचा, नंदा
No comments:
Post a Comment