आरती गोरवाडकर (निर्माण ४) धानोरा (जिल्हा- गडचिरोली) येथील
ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. एम.बी.बी.एस. झाल्यावर
सर्व सरकारी कॉलेजेस मधून बाहेर पडणाऱ्या डॉक्टर्सनी एक वर्ष वैद्यकीय अधिकारी
म्हणून सेवा देणे अनिवार्य असते. यातले ३ महिने आरतीने हरसूल (जिल्हा- नाशिक,
तालुका- त्र्यम्बक) येथील ग्रामीण रुग्णालयात सेवा दिली होती. नाशिकच्या आदिवासी
भागातील हरसूल येथील अनुभवाचा फायदा तिला गडचिरोलीच्या आदिवासी भागात सेवा देताना
नक्कीच होईल.
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Subscribe to:
Post Comments (Atom)
Best of luck! :)
ReplyDelete