पूर्व
विदर्भातील आदिवासींच्या जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान असणारी, येथील तीव्र हवामानात टिकून राहिलेली, पानगळीचे जंगल,
तसेच भातशेतीत सहज वावर करू शकणारी, कमी दूध
देणारी, कमी आकाराची कठाणी ही गुरांची दुर्मिळ जात. ही जात
आपल्या देशाच्या मान्यताप्राप्त गुरांच्या जातींच्या यादीत नाही. या जातीच्या
वैशिष्ट्यांबद्दल संशोधन केलंय सजल कुलकर्णीने (निर्माण २). ‘बायफ’च्या फेलोशिपअंतर्गत उरळीकांचन येथील मध्यवर्ती
संशोधन केंद्रात पशुसंवर्धनासंबंधित संशोधन करणाऱ्या सजलचे हे संशोधन ‘Indian Journal of Animal Sciences’ या शोधपत्रिकेत
प्रसिद्ध झालंय !
‘Management and physical features of tribal
Kathani cattle of Vidarbha region in Maharashtra state’ या शोधनिबंधात सजलने ‘कठाणी’ गुरांच्या
मालकांचे सामाजिक-सांस्कृतिक स्थान, गुरांचे व्यवस्थापन,
त्यांच्या आकाराचे मोजमाप इ. वैशिष्ट्यांबद्दल मांडणी केली आहे. ही
माहिती मिळवण्यासाठी सजलने गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर
जिल्ह्यांतील १२ खेड्यांमधल्या ३८९ कुटुंबांच्या १४७६ जनावरांचा सर्व्हे केला आहे.
या गुरांचा रंग, शिंगांचा व डोळ्यांचा रंग; लांबी, उंची, शिंग-कान-शेपूट
यांची लांबी; गुरांचा प्रचलित वापर, त्यांची
काम करण्याची क्षमता, किंमत इ. परिमाणांबद्दल विस्तृत
निरीक्षणे सजलने नोंदवली आहेत.
No comments:
Post a Comment