गुजरातमध्ये नर्मदा धरणासमोर सरदार वल्लभभाई पटेल
यांचा १८२ मी. उंचीचा (साधारणपणे ६० मजली इमारतीएवढा) पुतळा उभारला जात आहे.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखला जाणार असलेला हा पुतळा उंचीने ‘स्टॅच्यू ऑफ
लिबर्टी’च्या दुप्पट आहे. हा पुतळा व सोबतचा प्रकल्प यासाठी अडीच हजार कोटी
रुपयांचा खर्च येणार आहे. निमित्त या पुतळ्याचे, आणि सरदार पटेल यांच्यावरून देशात
जोरदार राजकारण सुरू झाले आहे. भाजप व कॉंग्रेस यांच्यात आपणच सरदार पटेलांचे
वारस आहोत हे पटवून देण्याची चढाओढ सुरू झाली आहे.
या मुद्द्याला पकडून निखिल वागळे यांनी सुप्रसिद्ध
इतिहासकार डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचे शब्दांकन साप्ताहिक
साधनाच्या ७ डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले. हा अंक पाहण्यासाठी:
No comments:
Post a Comment