मयूर सरोदेने (निर्माण ४) सुरू केलेल्या REnergize Eco-Planet कंपनीने Energy
Efficient Ceiling Fan ची नाशिक जिल्ह्यासाठी Distributorship घेतली आहे. Versa
Drive नावाच्या कंपनीने तामिळनाडू मध्ये Superfan नावाने या Fan ची Maufacturing
Factory काही महिन्यांपूर्वी सुरु केली आहे. सध्या घराघरामध्ये जे Ceiling Fan
वापरले जातात ते बहुतकरून ७५ W चे असतात. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जे काही 5 Star
Energy Efficient Ceiling Fan बाजारात मिळतात ते सुद्धा ६० W किंवा ५० W चे असतात.
परंतु महाग असल्यामुळे ते बहुतेक ऑफिसमध्ये किंवा Factory मध्ये असतात.
कंपनीच्या दाव्यानुसार Superfan हे केवळ ३५ W एवढी उर्जा वापरून इतर नामांकित
Fan एवढीच Air Delivery देतात. या Fans चं Packing Material सुध्दा Recycle केलं
जाऊ शकतं. यामध्ये Plastic किंवा Thermocole चा वापर केलेला नाही. Inveter वर
जेव्हा हे Fan वापरले जातात तेव्हा यामधून आवाज येत नाही. हे Fan बनवतांना BLDC
(Brushless DC) Motor वापरलेली असल्यामुळे हे Highly Energy Efficient असे आहेत. शिवाय
या Made in India Superfan चा Power Factor ०.९ असल्यामुळे सोलर प्रणाली मध्ये हे
खुपच चांगल्या पद्धतीने वापरले जाऊ शकतात.
सध्या चालू असलेल्या गावागावामध्ये सोलर लाईट पुरवण्याबरोबरच सोलर वर चालणारा
Fan सुध्दा पुरवण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे पारंपारिक Fan ला पर्याय म्हणून हा
Fan वापरल्यास विजेची भरपूर प्रमाणात बचत होते.
स्त्रोत- मयुर सरोदे, mayursarode17@gmail.com
No comments:
Post a Comment