१० डिसेंबर, २०१३
प्रिय मित्रांनो,
१.
नुकतेच नेल्सन मंडेलांचे निधन झाले. तुरुंगवासाच्या २७ पैकी
१८ वर्षे रॉबेन आयलंडवरील ज्या जेलमध्ये त्यांना ठेवले होते तो जेल व ती कोठडी मला
दाखवणारा गाईड हा स्वतः मंडेलांसोबत राहिलेला काळा कैदी होता. मंडेलांविषयी तो जे
म्हणाला त्यात त्यांचं सर्वात मोठं कार्य नेमकं पकडलं गेलं. तो म्हणाला,
“मंडेलांनी मला गोऱ्या लोकांप्रती माझ्या मनात असलेल्या द्वेषापासून मुक्त केले.”
२७ वर्षे आपल्याला तुरुंगात ठेवणाऱ्या गोऱ्या लोकांचा द्वेष करण्यापासून मंडेला
कसे मुक्त राहिले असतील? आपल्या मनाशी तुलना केली की मंडेलांची उंची कळते.
त्यांच्यावर वर्तमानपत्रात, टीव्हीवर भरपूर येते आहे. पण या
‘चॉकलेट पार्सल’ मध्ये प्रत्यक्ष मंडेलांनी लिहिलेला लेख...
२.
निर्माणमधील अनेक जण शिक्षणाशी संबंधित आहेत. शिक्षणाविषयी
विनोबांचा एक अतिशय मार्मिक लेख- जीवन आणि शिक्षण...
३.
देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत ‘मिंट’मधील दोन लेख व राजकीय वादावर ‘साधना’मधील मुलाखत यात तुम्हाला नवे
विश्लेषण किंवा दृष्टीकोन आढळेल. त्यातील मते स्वीकारण्याची गरज नाही. विवेकपूर्ण
विचार करण्याची पद्धत ग्रहण करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment