डॉ. प्रियदर्श तुरे व सहकाऱ्यांनी मिळून ‘investment in
humans’ (i2h) ही संस्था सुरू केल्याचे आपण जाणतोच. या संस्थेचे वेब
पोर्टल आकार घेत आहे. आपला वेळ, पैसा किंवा कौशल्ये समाजाच्या उपयोगी यावीत अशी
तळमळ अनेकांना वाटत असते. मात्र हे कसे करता येईल हे काही कळत नाही. याउलट अनेक
सामाजिक कामे करणारे गट व NGOs यांना स्वयंसेवक, काही कौशल्ये
तसेच आर्थिक मदतीची गरज असते. या दोघांना थेट सामोरासमोर आणण्याचे i2hworld.com हे पोर्टल करणार आहे.
फेसबुकप्रमाणेच या पोर्टलवरदेखील
प्रत्येक व्यक्ती / संस्थेला आपले प्रोफाईल उघडता येणार आहे. आपल्या आवडीचे
कार्यक्षेत्र / भौगोलिक ठिकाण टाईप केल्यानंतर त्या क्षेत्रात काम करणाऱ्या
संस्थांची यादी दिसणार आहे. स्वयंसेवकांना व देणगीदारांना एका क्लिकवर तशी गरज
असणाऱ्या संस्थांची यादी दिसणार आहे. तर संस्थांनादेखील आपल्या उपक्रमांबद्दल
घोषणा करून स्वयंसेवकांना सहभागी होण्यासाठी आवाहन करता येणार आहे.
येत्या डिसेंबरमध्ये या पोर्टलचे
टेस्टिंग होणार असून यादरम्यान १०० हून अधिक संस्था व १००० हून अधिक युझर्स
यांच्यासोबत हे टेस्टिंग करण्याचा प्रियदर्श व सहकाऱ्यांचा विचार आहे. आवश्यक
सुधारणा केल्यानंतर हे पोर्टल जानेवारी मध्ये सुरू होईल. याआधी तुम्हाला उत्तम सामाजिक
काम करणारे गट / संस्था माहित असल्यास त्याबद्दलची माहिती http://i2hworld.org/wp-content/uploads/2013/12/i2h-NGO-Subscription-Form-final.pdf या
फॉर्मद्वारे भरून पाठवण्याचे आवाहन प्रियदर्शने केले आहे.
No comments:
Post a Comment