फोटो काढायला/
पहायला/ दुसऱ्यांना दाखवायला/ फेसबुकवर अपलोड करायला आपल्या सर्वांनाच आवडते.
बरेचदा एखादा बोलका फोटो जे सांगून जातो ते एखादा निबंधही आपल्यापर्यंत पोहोचवू
शकत नाही. सीमोल्लंघनच्या यासदरात आपण पाहणार आहोत 'निर्माणींच्या
नजरेतून’ जग, अर्थात निर्माणींनी काढलेले फोटो. आजच्या समाजात निर्माणींना
कोणते व्यंग/वेगळेपण/वैशिष्ट्य दिसते?
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
No comments:
Post a Comment