सध्या
वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये दुष्काळाच्या प्रश्नावर उपाय म्हणून ‘शिरपूर पॅटर्न’ बद्दल बरीच चर्चा चालली आहे. ’शिरपूर पॅटर्न’ म्हणजे नेमके काय हे समजून
घेण्यासाठी सायली तामणे (निर्माण १), ज्ञानेश मगर (निर्माण४)
व रश्मी महाजन (निर्माण ५) यांनी शिरपूर (जिल्हा- धुळे) येथे श्री. सुरेश
खानापूरकर यांना भेट दिली. शिरपूर तालुक्यात जलसंधारणाचे काम २००४ सालापासून चालू
आहे. आतापर्यंत तालुक्यातील एकूण ३५ गावांमध्ये काम पूर्ण झालेले आहे.
या भेटीत
श्री सुरेश खानापूरकर यांच्याशी शिरपूर पॅटर्न बद्द्ल सविस्तर चर्चा झाली.
चर्चेदरम्यान श्री. खानापूरकरयांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांच्या
भूस्तररचनेची, जलनियोजनासाठी आवश्यक असलेल्या इतर घटकांच्या अभ्यासाबाबत
माहिती दिली व विविध शंकांचे निरसन केले. तसेच सध्या सुळे व बोराडी येथे चालू
असलेल्यानाला रुंदीकरण व बांध घालण्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणीदेखील केली.
या भेटीत झालेल्या
चर्चेतून असे लक्षात आले की शिरपूर पॅटर्न जर इतरत्र राबवायचे असेल तर आर्थिक
पाठबळ व राजकीय इच्छाशक्ती अत्यंत महत्वपूर्ण आहे.
No comments:
Post a Comment