अनेक निर्माणींनी Tata Institute of
Social Sciences (TISS) ह्या मुंबईमधील सामाजिक शास्त्रांसाठी
प्रसिद्ध संस्थेत प्रवेश घेऊन आपला कल व गती असणाऱ्या सामाजिक कामाच्या दृष्टीने
महत्त्वाचे पाउल टाकले आहे. यशवंत झगडे (निर्माण ४) व रसिका बलगेला (निर्माण ५) MSW (Dalit and Tribal Studies) साठी, अंबादास कुसाळकरला (निर्माण ५) MA (rural
development) साठी, अश्विनी महाजनला (निर्माण
१) Masters in Public Health साठी तर राजू भडकेला (निर्माण १)
MA (elementary education) साठी प्रवेश
मिळाला आहे. ह्या सर्वांचे मन:पूर्वक
अभिनंदन !
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
No comments:
Post a Comment