‘मी' च्या वेलांटीचा | सुटो सुटो फ़ांस;
वेढा क्षितिजास | नको
त्याचा .
एका सुईपोटी | कोटी कोटी हात,
भविष्य नी भूत | भेटताती .
रित्या स्वातंत्र्याचे | मिथ्या अवसान;
थोर आणि सान | बांधलेले .
बांधणारी शक्ती | अव्यक्त, अपार ;
तिचाही आहार | बांधलेला .
विभ्रम सांडतां | बांधिल्याचें ज्ञान ;
हेच शक्तिस्थान | ज्ञानियांचे .
ज्ञानांतून उठे | स्वातंत्र्याची लाट ;
तेव्हां लाभे घाट | भविष्याला .
यंत्राचें गा चक्र | स्वतःभोवती फ़िरे
म्हणोनी का ठरे | आत्मनिष्ठ ?
समष्टीविचारें | केलेंपण गळे ;
सृजनाचें कळे | परंगुह्य .
No comments:
Post a Comment