‘मी दारू पीत नाही, पण माझे अनेक मित्र पितात.
त्यांची दारू कशी सोडवू?’ आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न
पडतो, अनेकदा निर्माण शिबिरातही विचारला जातो. याला एक
निश्चित उत्तर नाही. सौरभ सोनावणेला (निर्माण ५) मात्र आपल्या मित्रांची दारू
सोडवण्यात यश मिळालंय. त्याच्या शाळेतील तीन मित्रांना अभियांत्रिकी शिक्षण घेताना
दारूचे व्यसन जडले. पिअर प्रेशर, फ़्रस्ट्रेशन अशा अनेक
कारणांनी ते वाढतच गेले. त्यापैकी दोघांची दारू पूर्णपणे सोडविण्यात व एकाची दारू
बऱ्याच अंशी कमी करण्यात सौरभला यश लाभले आहे. ह्यासाठी सौरभने त्याच्या मित्रांचे वेगवेगळ्या मार्गाने
समुपदेशन केले. त्यांना जास्त रचनावादी कामांवर लक्ष केंद्रित करायला सांगणे,
विविध छंदाना वेळ देण्यास प्रवृत्त करणे अशा विविध मार्गांचा त्यात
समावेश होता.
सौरभच्या वैद्यकीय
महाविद्यालयात देखील दारूच्या व्यसनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे असे
त्याला वाटते. त्यासाठी तो व त्याचे मित्र आनौपचारिक पद्धतीने अनेकांचे समुपदेशन
करतात. त्याच्या ह्या व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी शुभेच्छा !
No comments:
Post a Comment