श्रद्धा चोरगीचे ‘अक्षरभारती’सोबत काम सुरू
श्रद्धा चोरगीने (निर्माण ४) ‘अक्षरभारती’ या पुण्यातील
संस्थेसोबत Project Coordinator म्हणून काम सुरू केले आहे. दुर्गम भागातील उपेक्षित
वर्गाच्या ५-१५ वयोगटातील मुलांना वाचनाची आवड लागावी याकरिता
अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तके मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम अक्षरभारती करते.
या उपक्रमांतर्गत मुलांच्या गावातच वाचनालय सुरू करण्यात येते. वाचनालयाखेरीज
शास्त्रीय खेळण्यांची कार्यशाळा, सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा, संगणक प्रशिक्षण इ.
उपक्रम अक्षरभारतीकडून राबवले जातात. या उपक्रमांसोबतच संस्थेकरिता निधी जमा
करण्याच्या कामात श्रद्धा समन्वयक म्हणून काम पाहिल.
अधिक माहितीसाठी: http://www.aksharbharati.org/
No comments:
Post a Comment