High Finance and Aesthetic sense
"माझ्या लहानपणी मला आठवड्याला पाच सेंट
'भत्ता' मिळत असे; आणि त्या रकमेत आजच्यापेक्षा जास्त प्रमाणात दात किडत असत. मी प्रत्येक
सेंट नीट पारखत असे. 'चाल' चलन होते
सहाव्या जॉर्ज राजाचे चेहरे असलेले सेंट्स. राजाला दाढीमिश्या नव्हत्या, आणि त्याच्या सेंट्सना महत्वही नसे. काही थोड्या सेंट्सवर पाचवा जॉर्ज असे,
दाढीमिश्यावाला. पण खरं महत्व असे दुर्मिळ अशा सातव्या एडवर्डच्या
सेंट्सना, जास्त केसाळ चेहरा असलेल्या.
"इतर मुलं काचेच्या गोट्या, बाटल्यांची झाकणे वगैरेही वापरत. या सगळ्या चलानातही सुंदर असणे, दुर्मिळ असणे, वगैरेंना महत्व असे. शेवटी सर्व चलन
खाउच्या गोळ्या, चॉकलेट, आईस्क्रीम
कोन्स वगैरेंसाठी वापरलं जाई.
"वयाच्या आठव्या वर्षी मला पहिली
पगारदार नोकरी लागली. शेजारच्या बाळाला बाबागाडीतून फिरवायचे; तासाला पंचवीस सेंट्स; पोर फार थंड न पडता
सुरक्षितपणे परत आणले की पैसे पक्के. "
"एखादा डॉलर वगैरे प्रचंड रकमा जमा
झाल्या, की त्या ठेवायला बँकेत खाते उघडायची पद्धत होती.
सर्व पैसे काढून, सेंट्स करून खाऊ घेता येता असे. पण पैसे
ठेवताना- काढताना एक सेंट आणि दुसरा सेंट यांच्यात फरक केला जात नसे. यातून मला एक
नवं तत्व कळले: उच्च अर्थ-व्यवहारात सौंदर्यविचाराची गरज नसते. नशीब आपलं !"
*****
Margaret Atwood या कॅनडियन लेखिकेच्या 'payback'
या पुस्तकातील हा संपादित उतारा. CBC रेडियोतर्फे
दरवर्षी massey भाषणमाला 'भरवली'
जाते. २००८ साली Atwood ने कर्ज या संकल्पनेवर
पाच भाषणे दिली, ज्यातून 'payback' घडले.
Atwood अर्थशास्त्री नाही!
नंदा
No comments:
Post a Comment