'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 30 April 2016

अशी होळी सुरेख बाई

होळीचा सण साजरा करायला नागपूर गटाची काही मित्रमंडळी रवाळाया गावी गेली. रवाळ्याला वसंतभाऊ व करूणाताई फुटाणे आणि कुटुंबिय नेैसर्गिक शेतीचे प्रयोग करत आहेत. चार दिवसांच्या अभ्यास सहलीत या मित्रमंडळींनी होलिकादहन, धुळवड या गोष्टी भलेही केल्या नसतील, पण त्यांनी निसर्गातील ज्या रंगांचा अस्वाद घेतला; गौरी, करुणाताई आणि घरातील सर्वांमधील जे प्रेमाचे, मायेचे रंग अनुभवले; वसंतभाऊ, तन्मय यांच्या प्रेरणादायी विचारांचे रंग अनुभवले; शेतात काम करून शेतकरी आणि शेतमजूर यांना कराव्या लागणा-या ढोरमेहनतीचेही रंग अनुभवले; त्यांची काही क्षणचित्रे ...

तुरीच्या दाण्यांपासून १, २ नाही तर चक्क ८०० किलो तुरीची डाळ तयार केली!
२०-२२ प्रजातींनी नटलेली आमराई मोठ्या उत्साहाने फिरून दाखवताना वसंतभाऊ

आदिवासी जत्रा – संपूर्ण गावाच्या कल्याणासाठी गावातील भागातला उंच खांबावरून 
फिरवण्यात येते

स्वतःहून काहीतरी करत, धडपडत स्वतः शिकणं फारच आनंददायी असतं . . .No comments:

Post a comment