गेल्या बऱ्याच दिवसापासून
देशात देशद्रोह आणि देशभक्ती यावर बरंच राजकारण आणि गोंधळ चाललेला दिसतो. यातच भर
म्हणजे भरपूर मोठा युवा वर्ग सोशल मिडीया वर तासन तास यावर चर्चा आणि भांडणे करत आहे. बऱ्याचदा
असं दिसतं की कुठेतरी काहीतरी वाचून अंधारात तलवारबाजी सारख उगाच भांडण आणि चर्चा चालू
असते. तर देशद्रोह नक्की काय ? भारताचे
नागरिकत्व म्हणजे काय ? आर्थिक आणि सामाजिक समानता याचे महत्त्व काय ? या सगळ्या
बाबींवर एक चर्चा सत्र म्हणजे HumanKind.
८-१० एप्रिल दरम्यान हे चर्चासत्र नंदा काकांकडे घेण्यात आले. या चर्चासत्रांतील
सत्रांविषयी थोडक्यात...
रुचा वानखेडेनी (निर्माण ६) Freedom For Sale by John Kampfner या पुस्तकाची मांडणी केली. राजकीय
स्वातंत्र्याशिवाय आपण आर्थिक प्रगती करू शकतो काय? भांडवलशाही
ही मुक्त बाजारपेठेवर अवलंबून असते आणि बाजारपेठ ही मनुष्यावर. पण निवडीचं
स्वातंत्र खरंच मनुष्याला आहे काय? असे प्रश्न लेखक उपस्थित करतो.
भक्तीने (निर्माण ४) मूलभूत
कर्तव्ये आणि हक्क खूप गंमतीने खेळामधून समजून सांगितले. स्वांतत्र्य, समता, न्याय आणि
बंधुभाव या मूल्यांना विचारात घेऊन संविधान कशाप्रकारे लिहले गेले; त्याची
अंबलबजावणी कशाप्रकारे होते; देशाची न्यायव्यवस्था कशी आहे यावरही भक्तीने मार्गदर्शन केले. विविध प्रकारच्या
खटल्या आणि घटनांमध्ये न्यायव्यवस्था कशाप्रकारे काम करते यावर बरीच चर्चा झाली.
शैलेश जाधवने (निर्माण ६) The Spirit Level या पुस्तकाची मांडणी केली. दिवसेंदिवस श्रीमंत आणि गरीब याचांमध्ये असलेली दरी वाढत जात
आहे. ही असमानता गुन्हेगारी, नशेखोरी
आणि विविध समाजिक समस्यांना कशाप्रकारे पाणी घालत आहे यावर त्याने मांडणी केली.
आकाश नवघरेने (निर्माण ६) Claas Matters या पुस्तकाची मांडणी केली. दवाखान्यातील डॉक्टरपासून ते विध्यापीठातील शिक्षकापर्यंत सगळीकडे
तुमचा आर्थिक आणि सामाजिक स्तर पाहून तुमच्याबद्दल मत बनवले जाते आणि वागवले जाते. एका आर्थिक
स्तरातून दुस-या आर्थिक स्तरामध्ये उडी मारण्याकरिता किती संघर्ष करावा लागतो
याबद्दल चर्चा यावेळेस झाली.
अमृता प्रधानने (निर्माण २) नंदा खरे
यांच्या “उद्या” या कादंबरीची मांडणी केली. आर्थिक-सामाजिक असमानता, आभासी-खोट्या प्रतिष्ठेमुळे
आपला उद्या कसा असू शकतो हे चित्र नंदा खरे यांनी रंगवलं आहे.
याशिवाय विलास भोंगाडे, अमिताभ
पावडे, जयदीप हार्डीकर या ज्येष्ठांची आर्थिक, सामाजिक
व राजकीय विषयांवर सत्रे झाली. प्रत्येक चर्चासत्रामध्ये नंदा काका आणि विद्या काकूंचे मार्गदर्शन
सहभागींना लाभले.
No comments:
Post a Comment