भारतात लकवा आणि हृदयरोग हे मृत्यूंचे
सर्वांत मोठे कारण असल्याचे Registrar General of India यांनी
प्रसिद्ध केलेल्या अहवालात
स्पष्ट झाले आहे. शहरी आणि श्रीमंत
लोकांचे हे रोग ग्रामीण भागातही वाढत असल्याचे सर्चने नुकत्याच केलेल्या अभ्यासात
समोर आले आहे. ३९ गावांतल्या ४५
हजार लोकसंख्येचा अभ्यास केल्यानंतर दर एक लाख लोकसंख्येमागे ३८८ लोकांना कलवा
असल्याचे या अभ्यासातून दिसते. ग्रामीण
भागात अशा प्रकारचा अभ्यास २० वर्षांनंतर पहिल्यांदाच झाला आहे. २० वर्षांपूर्वी जो अभ्यास झाला होता
त्यात लकव्याचे प्रमाण दर एक लाख
लोकसंख्येमागे १६५ असे होते.
डॉ. योगेश कालकोंडे यांच्या नेतृत्वाखाली
झालेले आणि विक्रम सहाने (निर्माण
४) याची महत्त्वाची भूमिका
असणारे हे संशोधन Neuroepidemiology या
जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. आरोग्यदूतांनी
प्रश्नावलीच्या सहाय्याने लकव्याचे संशयित रूग्ण ओळखल्यानंतर त्यांना भेटी देऊन
लकव्याचे निदान करणे अशी महत्त्वाची जबाबदारी विक्रमने सांभाळली.
योगेश दादा, विक्रम
आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन!
या अभ्यासाबद्दल विस्ताराने वाचण्यासाठी
विक्रमशी संपर्क साधा - विक्रम
सहाने,
No comments:
Post a Comment