आकाश बडवेचा ६० शेतकरी
व कृषी अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रीय जैविक कृषी संमेलनात सहभाग
दंतेवाड्याच्या शेतकऱ्यांसोबत आकाश |
या संमेलनामध्ये आकाश बडवे (निर्माण ४) ने दंतेवाडा (छत्तीसगढ) जिल्ह्यातल्या ६०
शेतकरी आणि कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांबरोबर सहभाग घेतला. आकाश गेल्या अडीच
वर्षांपासून दंतेवाड्यात Prime
Minister’s Rural Development Fellow
म्हणून काम करतो आहे. आदिवासी शेतकऱ्यांबरोबर काम करत शाश्वत आणि सेंद्रीय
शेतीच्या माध्यमातून अन्नसुरक्षा, कुपोषण आणि आर्थिक विकास ह्या दिशेने त्याचे काम
गेल्या २ वर्षांपासून चालू आहे. सध्या हे काम दंतेवाड्यातल्या ८०० शेतकऱ्यांबरोबर
चालू आहे.
योगायोग असा की, २०१५ हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाद्वारे “International Year
of Soils for Sustaining Food and Farming Systems” म्हणन घोषित केलं आहे. चंदीगड
मध्ये झालेल्या राष्ट्रीय जैविक कृषी संमेलनासारख्या उपक्रमांमुळे शेतीचे प्रश्न
आणि त्यावर असलेला शाश्वत शेतीचा उपाय मुख्य प्रवाहासमोर अजून जोमाने येईल ही अशा.
स्त्रोत: आकाश बडवे, akashsbadave@gmail.com
स्त्रोत: आकाश बडवे, akashsbadave@gmail.com
No comments:
Post a Comment