'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 28 April 2015

विशेष मुलांच्या शिक्षणासाठी धीरज वाणीचे प्रयत्न

          निर्माण ६ च्या धीरज वाणीने त्याचे बी.एड. कर्ण बधीर मुलांच्या शिक्षणाच्या पद्धतींमध्ये केले. ह्या विषयाकडे खूप लोक वळत नसल्याने, पण त्याची अत्यंत गरज असल्याने त्याने हा निर्णय घेतला. कर्ण बधीर, औटिस्टिक मुलांना सामान्य सरकारी शाळांमध्ये शिकताना अनेक अडचणी येतात. ह्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून काही प्रकल्प राबविले जातात. अशाच एका प्रकल्पावर धीरज नाशिक जिल्हा परिषदेमार्फत काम करीत आहे. 

ह्या अंतर्गत, एकुण १२ प्रकारच्या डिसेबिलिटी असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम केले जाते. सध्या नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये काम सुरु असून त्यात धीरज विषयतज्ञ म्हणुन काम बघतो आहे. ३२० गावांमधील अंगणवाडी ते आठवी पर्यंतच्या विशेष मुलांची नाव नोंदणी, त्यासाठी लागणारे पालकांचे सामुपदेशन, अंगणवाडी सेविका व शिक्षकांचे ट्रेनिंग ही सर्व कामे धीरज बघतो. 
ह्याबरोबरच, स्पेशल मुलांच्या शिक्षणासाठी सिस्टिमच्या बाहेर सुद्धा धीरजचे प्रयत्न सुरु आहेत. आठवी पर्यंत नापास न करण्याच्या धोरणामुळे, अनेकदा विशेष मुले आठवी पर्यंत पुढे-पुढे ढकलली जातात. मात्र त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर न झाल्यामुळे आठवीच्या इयत्तेसाठी लागणारी कौशल्ये त्यांनी आत्मसात केलेली नसतात. त्यामुळे पुढे नववीमध्ये ह्या मुलांना कुठल्याच शाळेत प्रवेश मिळत नाही. ह्याचे विश्लेषण करण्याच्या हेतूने, अधिक माहिती मिळविण्यासाठी धीरजने एक RTI अर्ज दाखल केला आहे व त्यादृष्टीने अभ्यास देखील सुरु केला आहे. तसेच मराठी विज्ञान परिषदेमध्ये येणाऱ्या विशेष मुलांमध्ये विज्ञानाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी देखील तो प्रयत्नशील आहे. 
धीरजला त्याच्या कामासाठी शुभेच्छा ! 

स्रोत : धीरज वाणी,  dhirajwani@yahoo.com

No comments:

Post a Comment