गेल्या दोन महिन्यांत झालेल्या काही ठळक घडामोडींचा हा आढावा...
झुंज दुष्काळाशी
World
cup, IPL च्या रंगीबेरंगी व
झगमगीत बातम्यांमध्ये एखाद्या शेतकऱ्याची एखाद्या आत्महत्येची छोटीशी बातमी सहज
लपून जाते. पण या एक एक आत्महत्येची बेरीज केली तर फक्त मराठवाड्यात गेल्या
वर्षभरात दुष्काळ व नापिकीने घरातली आर्थिक घडी विस्कटलेल्या शेतकऱ्यांच्या ५००
हून अधिक आत्महत्या झाल्या. गेल्या दोन
महिन्यांमध्ये हा आकडा १५० वर जातो!
कोणतंही संकट त्यावर उपाय शोधण्याची संधी घेऊन येतं.
एप्रिल-मे महिना हा सुटीचा काळ. या काळात निर्माणचे व इतरही अस्वस्थ युवा आणि
दुष्काळाची समस्या यांच्यात पूल बनवायाचा प्रयत्न केलाय Maharashtra
Knowledge Foundation, प्रगती अभियान
(नाशिक),
मराठवाडा शेती सहाय्य मंडळ (जालना), कृषी विज्ञान केंद्र (जालना), मानवलोक (बीड), ग्रामगौरव प्रतिष्ठान (पुणे), ACWADAM (पुणे) आणि निर्माणने.
‘झुंज दुष्काळाशी’ या कार्यक्रमाबद्दल बोलताना नायना म्हणाले, “माझ्या विद्यार्थीदशेत मी स्वयंसेवक म्हणून दुष्काळग्रस्त
मराठवाड्यात गेलो होतो. ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्थेचे मला वेगळेच दर्शन झाले.
वैद्यकीय डिग्री घेताना आपले शिक्षण ग्रामीण भागांत आरोग्यसेवा देण्यासाठी सक्षम
करत नसल्याची जाणीव झाली. माझे पुढील आयुष्य घडवण्यासाठी या अनुभवाची मदत झाली.
दुष्काळाच्या कठीण काळात
आजही बदलाच्या काही संभावना आहेत.
- सेवेची संभावना – दुष्काळी गावांमध्ये रिलिफच्या रुपात तत्कालिक सेवेची संधी तरुणांना आहे.
- पाणी व्यवस्थापन – दीर्घकालीन आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाच्या दिशेने कृती करण्याची संधी तरुणांना आहे.
- या कृती कार्यक्रमाच्या निमित्ताने समाज, पर्यावरण, सेवा कार्य आणि स्व या चारही पातळ्यांवर समजून घेण्याची, स्वतःला पारखण्याची आणि शिकण्याची संधी या निमित्ताने तरुणांना मिळू शकते.
- निर्माण आणि पाण्याच्या प्रश्नावर स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापनावर काम करणारे महाराष्ट्रातील नवीन कृतीशील युवा शोधता येऊ शकतात.
- समाजातील समस्या, समस्यांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था आणि महाराष्ट्रातील युवा यांची एकमेकांना ओळख होऊ शकते.”
पुरंदर तालुक्यात गावकऱ्यांसोबत चर्चा करताना स्वयंसेवक |
गावांतील पाण्याची परिस्थिती, संसाधने यांचे सर्वेक्षण करून कृती आराखडा बनवणे; प्रत्येक शेतात पावसाचे पाणी अडवता व जिरवता यावे यासाठी net
planning; रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार योजना, गावांत करण्यासारखी पाणलोटाची कामे इ. बाबत जागृती आणि
पाठपुरावा; रोजगार
हमी योजनेअंतर्गत गावकऱ्यांना काम मिळावे यासाठी मदत इ. कामे स्वयंसेवक करतील.
याशिवाय दुष्काळग्रस्त गावांत काही दिवस राहून प्रत्यक्ष जगण्यातून दुष्काळ
अनुभवातील.
यापैकी नाशिक, पुणे आणि बीड जिल्ह्यांत काम सुरू झाले असून त्याविषयी
सविस्तर वृत्तांत व स्वयंसेवकांचे अनुभवांविषयी पुढच्या अंकात वाचूच...
*****
धान्यापासून दारू : Updates
दुष्काळाप्रमाणे निर्माणच्या युवांनी स्पष्ट भूमिका घेऊन जो प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तो म्हणजे ‘धान्यापासून दारू निर्मिती’. सरकारच्या या योजनेचे फलित शोधण्याचा प्रयत्न ‘कॅग’ने केला आहे. वारेमाप दिल्या गेलेल्या सवलतींनी केवळ मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना करोडोंचा फायदा झाला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. १३२ कोटी ८२ लाख एवढा करदात्यांचा पैसा मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना सवलती देण्यासाठी वापरला गेल्याचा खोचक शेरा कॅगने मारला आहे. या योजनेमुळे ज्वारीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असा दावा या योजनेच्या सुरवातीपासून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात मात्र घटच होत आलेली आहे.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5619014248288252550&SectionId=28&SectionName=%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A5%20%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE
*****
भारत सरकार तर्फे ‘पंतप्रधान युवा नेतृत्व विकास कार्यक्रम’ येऊ घातला आहे. त्याचसाठी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात
आलेल्या विचारमंथन बैठकीस युवा व क्रीडा मंत्रालयाकडून अमृत बंगला आमंत्रण आले
होते. ‘निर्माण’च्या अनुभवाच्या आधारे अमृतने या बैठकीत सुझाव दिले.
‘कर के देखो’ फेलोशिप साठी निर्माणच्या १४ युवांनी रस दर्शवला असून
आतापर्यंत ५ फेलोजसाठी निधी उभा करण्यात निर्माण टीमला यश आले आहे.
*****
No comments:
Post a Comment