'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

तिनका तिनका जर्रा जर्रा

मार्टिन ल्यूथर किंगचं एक वाक्य, Civil Disobedience किंवा भारतीय संदर्भात सत्याग्रहाबद्दल :

एखादा अन्याय्य कायदा तोडणार्‍याने उघडपणे, प्रेमाने आणि शिक्षेची जबाबदारी स्वीकारायच्या तयारीने तो तोडला पाहिजे. One who breaks an unjust law must do so openly, lovingly and with a willingness to accept the penalty.

ह्या तुकड्यासकट दहा तुकडे "तिनका तिनका, जर्रा जर्रा" नावाने तुमच्यापुढे मांडले. मुळात तो मथळा निर्माणच्या पहिल्या संचामध्ये सायलीने म्हटलेल्या एका गाण्यावरून घेतला (तिला मी तिला चिडवायला तसे नाव निवडले, असे वाटले. पण आतापर्यंत तिला मी गंभीरपणे ते नाव निवडले, हे पटले असावे!).
उपदेश करणे व  स्वीकारणे या दोन्ही गोष्टी मला अनुक्रमे जमत व आवडत नाहीत. पण अगदी दोन पानांचे लेख वाचणेही आजकाल जड जाताना दिसते. म्हणून हा मार्ग निवडला; पूर्णपणे असमाधानकारक. अशी चटपटीत वाक्ये फार गहन सत्ये सांगतात असे वाटते, पण त्या वाक्याच्या, त्या सूत्राच्या मर्यादा मात्र स्पष्ट होत नाहीत. आजची भाषा वापरायची, तर हे 'विकिपीडिया' ज्ञान आहे. तिथून सुरुवात करून तुम्ही पुढे जास्त जास्त खोलात विचार केलात, माहिती मिळवलीत, तरच त्याला अर्थ आहे -- XXXX!
उपदेश करायला लागलो की! थांबावे हेच बरे!
आणि थांबणे या महिन्यापुरते नसून टोटल/ फायनल आहे. तुकड्यांची चित्रे काढा.
त्यासाठी शुभेच्छा.


          तुमचा, नंदा.

No comments:

Post a Comment