नाशिकमधील निर्माण आणि कृती या गटांचे
काही मित्र-मैत्रिणी महानगरपालिकेचा खत प्रकल्प पहायला गेले होते. तिथे अधिकृत कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त साधारण ८०
स्त्री-पुरुष कचरा वेचण्याचे काम करतात. त्यांची कुठेही नोंद नसल्याने त्यांना कोणत्याही
सुविधा, साधने मिळत नाहीत. त्यांच्यासोबत कामाची सुरुवात
म्हणून एका आरोग्य तपासणी शिबिराचे या गटाने आयोजन केले होते. कचरा वेचकांचे प्रश्न आणि
त्यांच्या आरोग्याची सद्यस्थिती जाणून घेणे असा यामागचा उद्देश होता. या उपक्रमात
श्री गुरुजी रुग्णालयाचे काही डॉक्टर्स सहभागी झाले. इथून पुढे कचरा वेचकांच्या
प्रश्नांसाठी काय करता येईल याचा हा गट विचार करत आहे.
स्त्रोत : मुक्ता नावरेकर- muktasn1@gmail.com
No comments:
Post a Comment