निर्माण पुणे
गटाच्या मागील भेटीत, गटाची वैचारिक प्रगल्भता वाढावी ह्या
दृष्टीने श्री. अमोल फाळके व निर्माणचाच आपला मित्र अभिजित सफई ह्यांची सत्र
आयोजित करण्यात आली होती.
श्री. अमोल फाळके
हे गेली अनेक वर्ष 'अर्थक्रांती' ह्या
चळवळीशी जोडलेले असून, सध्या ते 'पर्यायी
अर्थव्यवस्था' ह्या संकल्पनेवर महाराष्ट्र नॉलेज फौंडेशन
बरोबर काम करीत आहेत. अमोल फाळकेंनी अर्थक्रांतीची गरज, मूळ
संकल्पना, ती प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग व अडचणी ह्या सर्व विषयांवर मोकळेपणाने मार्गदर्शन केले.
मुलांनीदेखील उत्साहाने चर्चेत भाग घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
अर्थक्रांती हा सक्षम अर्थव्यवस्थेकडे नेणारा एक विचार
असून त्यातील काही सूचना खालीलप्रमाणे आहेत.
·
प्रचलित कर
प्रणाली पूर्णत: काढून टाकणे
·
सर्वस्तरीय
सरकारी महसुलासाठी ‘बँक व्यवहार कर’ हा
एकमेव कर लागू करणे
·
उच्च मूल्याच्या
नोटा सरसकट बंद करणे
·
रोखीच्या
व्यवहारांवर कुठलाही कर लागू न करणे
·
विशिष्ट
मर्यादेपर्यतच्याच रोखीच्या व्यवहारांना मान्यता देणे
ह्याच प्रसंगी
अभिजीत सफई ह्याने 'आयुर्वेदिक चिकित्सेची चिकित्सा'
ह्या विषयावर त्याचे विचार मांडले. आयुर्वेद चिकित्सेत सध्या जुन्या
पद्धतींनाच धरून ठेवण्याच्या अट्टाहासामुळे नवीन संशोधन व खुल्या चिकित्सक
दृष्टीचा आभाव दिसतो आहे असे मत अभिजीतने मांडले व विविध उदाहरणे व संदर्भ देऊन
त्यांची पुष्टी केली. निर्माणच्या गटानेदेखील या बाबतीत अभिजीतला अनेक प्रश्न
विचारले.
No comments:
Post a Comment