सुहेल शिकालगार (निर्माण ४), साताऱ्यातील पाटण
तालुक्यातल्या मल्हारपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) वैद्यकीय अधिकारी म्हणून जानेवारीपासून कार्यरत आहे. त्याच्या गावाची लोकसंख्या
३०,५३२ असून त्याच्या PHC अंतर्गत ५ उपकेंद्रे आहेत. ह्यातील
२ आदिवासी भागात आहेत. Indian Public Health Standards (IPHS) नुसार, ज्या PHC मध्ये महिन्याला
१० किंवा जास्त प्रसुती होतात व एका ठराविक संख्येपेक्षा जास्त पेशंट्स असतात
त्यांना (IPHS) च्या सर्व सुविधा, जसे
की रुग्णवाहिका, National Rural Health Mission कडून निधी इ.
मिळतात. मात्र शासकीय यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे ह्या सुविधांचा लाभ लोकांपर्यंत
पोहोचत नाही असा सुहेलचा अनुभव आहे. तसेच गावपातळीवरील राजकारणामुळेदेखील बराच तणाव
असतो असे देखील तो सांगतो.
अशा
परिस्थितीतदेखील सुहेल त्याच्या परीने शक्य तितके प्रयत्न करून लोकांपर्यंत
आरोग्याची सुविधा पोहोचवतो आहे. महिन्याला ८०० -९०० च्या आसपास असलेल्या
बाह्यरुग्णांची संख्या आता १८०० - १९०० पर्यंत वाढली आहे. ‘लोक वेळप्रसंगी थांबून
राहणे पसंत करतात पण दुसरीकडे जात नाहीत’ हादेखील एक मोठा बदल झालेला त्याला
जाणवतोय. तसेच परिसरातील शाळांमध्ये adolescent
health बद्दल जागृती करणे, De-addiction व Counselling
करून पेशंटला पुण्यातील मुक्तांगण येथे दाखल करणे असे अनेक उपक्रम
तो राबवत असतो. सरकारी नियमानुसार त्याच्या भागातील ११ PHC वर किमान २२ डॉक्टर तरी हवेत, मात्र प्रत्यक्षात
केवळ ९ च असल्याचे दिसतात. ह्या MOship च्या अनुभवावरून खूप
काही शिकल्याचे तो सांगतो.
त्याला त्याच्या कार्यासाठी
शुभेच्छा !
No comments:
Post a Comment