२ ऑक्टोबर, २०१३
प्रिय युवा मित्रांनो,
ऑक्टोबर महिन्याचे ‘चॉकलेटचे पार्सल’ पाठवतो आहे.
नुकतेच
उत्तर प्रदेश मध्ये हिंदु-मुस्लीम दंगे झालेत. हिंदु-मुस्लीम प्रश्नावर आपले
स्वतःचे विचार काय आहेत? मुस्लीम धर्माविषयी आपल्याला किमान माहिती तरी आहे का?
कोणते आक्षेप आपल्या मनात आहेत? इथूनच सुरुवात व्हावी. या विषयावर विनोबांचे एक
विस्तृत भाषण आज पाठवतो आहे. वरून विशेषता ही की हे भाषण किंवा संवाद स्वतः साने
गुरुजींच्या हस्ताक्षरात लिहून काढलेली एक प्रत नुकतीच सापडली. तिच्यावरून बनवलेली
ही प्रत आहे.
समडोळीला झालेला दोन
निर्माणींचा अधःपात आपण पाहिला आहे. आर्थिक लोभापायी भल्याभल्यांची काय अवस्था
होते? सामाजिक कार्यात आर्थिक नीतीपूर्ण व्यवहार कसा महत्त्वाचा? मॅकेन्सी कंपनीचे
प्रमुख राहिलेल्या रजत गुप्तांच्या गुन्ह्यावरून आपल्याला काय कळते? ‘इकॉनॉमिस्ट’
मधील एक लेख त्यादृष्टीने...
डॉ. अतुल गावंडे हे
अमेरिकेतील डॉक्टर उत्कृष्ट लेखक आहेत. त्यांचा ‘न्यूयॉर्कर’ मधला लेख प्रत्येकाला
विचार करायला मदत करेल.
आज गांधी जयंती. या २३
सप्टेंबरला माझ्या जन्मदिनापासून मी दर महिन्याला ३ दिवस सेवाग्राम आश्रमात राहायला
सुरुवात केली. बापुकुटीच्या शेजारीच महादेव कुटीमध्ये माझी राहण्याची व्यवस्था
आहे. या कुटीतच पिताजी दहा वर्षे राहिलेत. सेवाग्राम आश्रम व पिताजी या दोघांचे ऋण
अंशतः उतराई होण्यासाठी हे तीन दिवस. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे गांधीजी व
सेवाग्रामचा सहवास तीन दिवस मिळेल.
दारू व तंबाखूचे प्रश्न
निर्माणसाठी महत्त्वाचे. २ व ३ ऑक्टोबरला महाराष्ट्र शासनातर्फे २रे व्यसनमुक्ती
साहित्य संमेलन नागपूरला भरते आहे. राणी त्या संमेलनाची अध्यक्ष आहे. अनिल (अवचट)
व मीदेखील भाग घेतो आहोत.
ऑक्टोबरचे चॉकलेट पार्सल
वाचा. काय आवडले/नाही, पटले/नाही ते जरूर लिहा. चर्चा करा. तुमची प्रतिक्रिया
निखिल जोशीस पाठवा. ती सर्वांसोबत वाटली जाईल.
शुभेच्छा,
नायना
या
पार्सलमध्ये:
महात्म्याशी भेट: डॉ. अभय बंग
No comments:
Post a Comment