'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

पुस्तक परिचय

विचार तर कराल – डॉ. नरेंद्र दाभोलकर

अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे हे चौथे पुस्तक आहे. अंधश्रद्धेशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संबंधित घटना आपल्या बाजूला सतत घडत असतात. आपण त्या गोष्टींकडे विस्मयचकित होऊन पाहतो. काही वेळा एखादी गोष्ट खरंच गूढ आहे असं मानून आपण ती सोडून देतो किंवा ‘असेल काही विज्ञानाच्या पलीकडचे’ म्हणून नतमस्तक होतो. विचार करण्याची, सत्यशोधनाची सवय आपल्याला नसते. विचार करण्याबद्दल आळस असतो, अज्ञान असते, भीती असते. ‘गरज काय पडली’ अशी वृत्ती असते. अशा वृत्तींमुळे आजूबाजूला अनिष्ठ घडत असूनही ते आपल्याला जाणवत नाही असे दाभोलकरांचे म्हणणे आहे. अशाच घटनांबद्दल ‘विचार तर कराल’ हे सदर त्यांनी बराच वेळ वर्तमानपत्रात चालवले. दाभोलकरांनी या पुस्तकात प्रत्यक्ष घडलेल्या घटनांचा डोळस मागोवा घेण्याचे सूत्र कायम ठेवले आहे. दाभोलकरांनी या पुस्तकातून वैज्ञानिक दृष्टीतून विचार मांडले आहेत. ही एक वैश्विक विचारपद्धती आहे. उच्चशिक्षित माणसे व बायकादेखील अंधश्रद्धेला बळी पडतात, तिथे अशिक्षित लोकांचे काय बोलावे हे वेगवेगळया अनुभवांवरून दाभोलकरांनी सांगितले आहे.

डॉक्टरबाबू – डॉ. शशांक परुळेकर
वैद्यकीय शिक्षण हे बाकीच्या शिक्षणापेक्षा वेगळे पडते, कारण हे शिक्षण घेताना आणि घेतल्यावरसुद्धा जिवंत माणसासोबत संबंध येतो. डॉक्टरीला मुलाचा नंबर लागल्यावर घरातले तसेच बाहेरचे देखील आनंदी होतात. पण डॉक्टर या व्यवसायाचा कौटुंबिक इतिहास नसलेल्या मुलांना हे शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात. अभ्यासाची मोठमोठी पुस्तके, practicals, journals याबद्दल अनुभव, कॉलेजमधील चांगलेवाईट किस्से लेखकाने विनोदी शैलीत सांगितले आहेत. वैद्यकीय शिक्षण घेताना आनंदाचा ठाण म्हणजे gatherings ! त्याचदरम्यानचे विविध ‘डे’ज व त्यांचे किस्से देखील लेखकाने अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले आहेत. MBBS परीक्षेदरम्यान घडणारे अन्यायाचे क्षण, ‘फक्त चांगले ज्ञान आहे म्हणून पास होईल’ या criteria सोबतच इतरही अनेक महत्त्वाचे criteria लेखकाने सांगितले आहेत. MBBS ची शेवटची परीक्षा पास झाल्यानंतर internship दरम्यानच्या विविध departments च्या गोष्टी, internship न करताही विद्यार्थ्यांना मिळणारे completion आणि internship न करता मिळणारे best intern चे बक्षीस हे तर प्रत्येक intern ने वाचण्यासारखे आहे. Post graduation ला लागल्यावर operations च्या वेळेस होणाऱ्या गंमतीजंमती प्रत्येकाने वाचायलाच हव्यात अशा आहेत. वैद्यकीय क्षेत्रात senior/ lecturer/ AP/ HOD हे दैवत असतात. त्यामुळे त्यांनी operation theatre मध्ये केलेल्या चुका आपली इच्छा नसतानाही PG परीक्षेत पास होणे त्यांच्या हातात आहे म्हणून लपवणे, त्या दुरुस्त करणे असे प्रसंग खूप शिकवणारे आहेत.
हे पुस्तक का वाचावे? वैद्यकीय शिक्षण म्हणजे नेमके काय? त्यामधील गंमतीजंमती, हेवेदावे, मुलामुलींची प्रेमप्रकरणे, डॉक्टर-पेशंट नातेसंबंध असे विविध पैलू जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी जरूर वाचावे.
डॉ. शशांक परुळेकर यांनी KEM hospital मधून MBBS केले असून त्याच कॉलेजमधून PG OBGY केले आहे. सध्या ते Seth GS Medical College, KEM Hospital, Mumbai येथे Department of Obstetrics & Gynecology चे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत.

डॉ. शिवप्रसाद थोरवे, shivprasad.thorve92@gmail.com

No comments:

Post a Comment