राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत भूषण देव
(निर्माण ५) जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात बालस्वास्थ्य वैद्यकीय अधिकारी
म्हणून रुजू झाला आहे. या अंतर्गत फिरत्या दावाखान्यासोबत ०-१८ वयोगटातील मुलांची
आरोग्य तपासणी व उपचार करणे, तसेच शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या आजारांचे उपचार अशा
विशिष्ट सेवांची गरज असणाऱ्या मुलांना योग्य ठिकाणी रेफर करणे हे भूषणचे काम असणार
आहे. या कार्यक्रमांतर्गत एक वर्षभरांत २१४ अंगणवाड्यातील १५,६७८ मुलांची दोन वेळा
तर १६० शाळांतील (आश्रमशाळांसहित) २८,३८७ मुलांची एक वेळा तपासणी होणार आहे.
भूषणला या प्रवासासाठी शुभेच्छा!
स्त्रोत : भूषण देव- drbhushandeo@gmail.com
No comments:
Post a Comment