निर्माण शिबिरांत आपल्या अनेक मार्गदर्शक
आपला प्रवास शिबिरार्थ्यासमोर मांडतात. या प्रवासादरम्यान घडलेल्या अनेक घटनांनी
आपण प्रभावित होऊन जातो. आपल्याही जीवनात आपली मूल्ये/विचारांची परीक्षा पाहणाऱ्या
अनेक घटना येत असतात. आपल्यातलाच एक मित्र, भागवत रेजीवाड
(निर्माण ५), नुकतेच घडलेल्या एका घटनेदरम्यान निर्माण सत्राचा अर्थ आपल्या जीवनात
शोधू शकला आहे.
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात BAMS
करणारा
भागवत इंटर्नशिपदरम्यान नांदेडच्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अपघात विभागात
जबाबदारी सांभाळत होता. नांदेडच्या अपघात विभागात आजूबाजूच्या जिल्ह्यांतील शासकीय
रुग्णालयातून रुग्ण रेफर होत असल्यामुळे
रोजच खूप मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. या रुग्णांना आपात्कालीन सेवा देण्यासाठी ३
इंटर्न्स व एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक झाली होती. मात्र रुग्णांची संख्या पाहता
इंटर्न्सची संख्याही वाढवावी यासाठी भागवत व सहकाऱ्यांनी संप पुकारण्याचा निर्णय
घेतला.
निर्माण शिबिरात
‘सेवाग्राम ते शोधग्राम’ या प्रवासादरम्यान नायनांनी रुग्णांची गैरसोय होऊ नये
म्हणून संपावर जाण्यास नकार दिल्याचे सांगितले होते. ‘आपण संपावर गेल्यावर रुग्णांना,
त्यातही तातडीने आरोग्यसेवेची गरज असणारे रुग्णांना कोण आरोग्यसेवा देईल?’ असा
विचार भागवतला छळत राहिला. अखेर त्याने संपातून माघार घ्यायचा निर्णय घेतला व
अपघात विभागात आपली जबाबदारी सांभाळली. मूल्यांच्या परीक्षेत खरे उतरल्याबद्दल
भागवतचे अभिनंदन !
स्त्रोत-
भागवत रेजीवाड
No comments:
Post a Comment